गुन्हे विषयक
महिलेस मारहाण,पाच जणांवर गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
माहेरी असलेल्या महिलेने आपल्या मुलाला शाळेत दाखल करण्यासाठी त्याच्या जन्माचा दाखला मिळावा यासाठी सासरी जाऊन ‘तो’ मागितला असता त्याचा राग येऊन आरोपी सासरा भानुदास लक्ष्मण मांजरे,सासू सुमन भानुदास मांजरे,मारुती भानुदास मांजरे,सुरेखा मारुती मांजरे,नवरा कैलास भानुदास मांजरे यांनी एकत्र येऊन तीस शिवीगाळ करून काठीने मारहाण केली असून तीला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा पायल कैलास मांजरे (वय-२३) हिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे येसगाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
सदर फिर्यादी महिला आणि तिचा नवरा आणि सासरच्या मंडळींचे काही कारणावरुन वाद आहेत.त्याबाबत त्यांचा मामला न्यायालयात दाखल असून न्यायालयातून ती काही दिवसापूर्वी सासरी आली होती.मात्र काही दिवस ती सासरी नांदली असताना पुन्हा त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याने ती पुन्हा एकदा माहेरी गेली होती.या जोडप्यास एक अपत्य असून त्यास शाळेत घालण्यासाठी सदर महिला ही या अपत्याचा शाळेचा दाखला आणण्यासाठी आज शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सासरी गेली होती.तिने आपल्या मुलाचा दाखला मागितला असता सासरच्या मंडळींना राग आला व त्यातील आरोपी सासरा भानुदास लक्ष्मण मांजरे,सासू सुमन भानुदास मांजरे,मारुती भानुदास मांजरे,सुरेखा मारुती मांजरे,नवरा कैलास भानुदास मांजरे आदीनी एकत्र येऊन तीस शिवीगाळ करून काठीने मारहाण केली असून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
दरम्यान या प्रकरणाने ती घाबरून जाऊन तिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदीप कोळी,सहाय्यक फौजदार अशोक आंधळे यांनी भेट दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्र.१९५/२०२४ भा.द.वि.कलम १४३,१४७,१४८,१४९,३२४,३२३५०४,५०६,म.पो.कायदा कलम ३७(१)(३)१३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आंधळे करत आहे.