निवडणूक
लोकसभा निवडणूक खर्च लेखे तपासणी वेळोपत्रक जाहीर…
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे निवडणूक खर्च तपासणीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.३ मे,७ मे व ११ मे २०२४ रोजीच्या दिनांकास सकाळी १० ते सायकांळी ५ या वेळेत उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या खर्चाचा हिशोब सादर करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी नुकतेच एका प्रसिद्धी पत्रकानंव्ये केले आहे.
शिर्डी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी त्यांची दैंनदिन खर्चाची नोंदवही संपूर्ण प्रचार कालावधीत किमान तीन वेळा खर्च निरीक्षकांसमोर सादर करणे आवश्यक आहे.जे उमेदवार निवडणूक खर्चाचे लेखे तपासणीकरिता सादर करणार नाहीत त्यांच्यावर लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील १९५१ बाब क्र.७७ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याबाबत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत.शिर्डी लोकसभेतील उमेदवारांच्या खर्च लेख्यांची तपासणी ३ मे, ७ मे व ११ मे २०२४ या तारखेला निवडणूक खर्च सनियंत्रण कक्ष, उपकोषागार कार्यालय, प्रशासकीय इमारत,राहाता येथे केली जाणार आहे.या तारखांना सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या दैंनदिन खर्चाच्या नोंदवह्या,देयके,प्रमाणके यांच्यासह उपस्थित राहावे असे आवाहन शेवटी श्री.कोळेकर यांनी केले आहे.