गुन्हे विषयक
दागिण्यावर डल्ला,…या पोलीस ठाण्यात गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव बस आगारात शनिवार दि.२७ एप्रिल रोजी दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील फिर्यादी महिला मंदाबाई चंद्रभान निकम (वय-५६) या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्स मध्ये ठेवलेले ३६ हजारांचे सोन्याचे विविध दागिने व १५०० रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला आहे.त्यामुळे त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.
कोपरगाव शहरात भुरट्या चोऱ्या वाढल्या असून विद्युत मोटारीच्या चोऱ्याही वाढल्या आहेत.त्यामुळे नागररिकांत भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.अशीच घटना आज दुपारी १२.४५ वाजता राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव बस आगारात घडली आहे.यातील तळेगाव दाभाडे इंदिरानगर कॉलनी ता.मावळ येथील रहिवासी फिर्यादी महिला या कोपरगाव येथील बस स्थानकात आल्या होत्या.त्या बसने आपल्या घरी जात असताना त्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्या पर्समधील ३६ हजारांचे सोन्याचे विविध दागिने त्यात ०४ ग्रॅम वजनाचा बहुरानी दागिना,०५ ग्रॅम वजनाचे कानातील झुबे व १५०० रुपयांची रोख रक्कम त्यात ५००,२०० रुपये दराच्या नोटा असा एकूण ३७ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला आहे.
दरम्यान घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी भेट दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी सदर महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.२११/२०२४ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए.एम.दारकुंडे हे तपास करत आहेत.या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.