जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

..या विद्यालयाचे एन.एम.एम.एस.परीक्षेत यश

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   राष्ट्रीय आर्थिक दुबर्ल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.)परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला असून या शिष्यवृत्ती परीक्षेत कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांने लक्षवेधी यश संपादन केले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या परिक्षेत साई कुलकर्णीसह विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांस सारथी शिष्यवृत्ती प्राप्त झाली असून त्यां मध्ये कु.सायली अरुण घोडेराव,जान्हवी सचिन गूळे,साई दादासाहेब डांगे,पार्थ मच्छिंद्र लोहकणे,सुजल गजेंद्र साबळे आदींचा समावेश आहे.

सन-२००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक पालकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना (एन.एम.एम.एस.) हि भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने आयोजीत करण्यात येत असते.यात आर्थिक मागास प्रज्ञावंत विद्यार्थी शोध घेण्यासाठी व त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करण्यासाठी व इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण घेता यावे यासाठी हि परीक्षा घेण्यात येत असते.सदर परीक्षा जुलै २०२३ मध्ये संपन्न झाल्या होत्या.त्याचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहे.यामध्ये कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंद विद्यालयाचा विद्यार्थी साई नारायण कुलकर्णी हा विदयार्थी पात्र झाला असून ह्या विदयार्थीला दरवर्षी १२ हजार रुपये याप्रमाणे इयत्ता ९ वी ते १२वी अखेर चार वर्षांसाठी ०४ हजार ८०० रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.सोबतच विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांस सारथी शिष्यवृत्ती प्राप्त  झाली असून त्यां मध्ये कु.सायली अरुण घोडेराव,जान्हवी सचिन गूळे,साई दादासाहेब डांगे,पार्थ मच्छिंद्र लोहकणे,सुजल गजेंद्र साबळे हे विदयार्थी पात्र झाले असल्याची माहिती मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी दिली आहे.या विद्यार्थ्यांना  एकूण दोन लक्ष चाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.या सर्व यशस्वी विदयार्थीचा गौरव करण्यात आला आहे.

   या परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त करणाऱ्या या विद्यार्थ्यांना कुलदीप गोसावी,पंकज जगताप,सौ.जी.एन.जाधव, एस.डी.जाधव मॕडम आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले होते.

दरम्यान यशस्वी विद्यार्थ्यांचे कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे,स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,सहसचिव सचिन अजमेरे,सदस्य संदीप अजमेरे,आनंद ठोळे,डाॕ.अमोल अजमेरे,राजेश ठोळे यांनी अभिनंदन केले आहे.

  या कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले तर सुत्रसंचलन श्वेता मालपुरे यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका उमा रायते यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close