निवड
…या प्राध्यापकांना हिंदीची पी.एच.डी.प्रदान
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरालगत असलेल्या के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या हिंदी संशोधन केंद्राचे संशोधक विद्यार्थी रवींद्र पुंजाराम ठाकरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी.एच.डी.(विद्यावाचस्पती) ही उच्च पदवी नुकतीच जाहीर झाली आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हिंदी ही भारत देशामधील सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे.हिंद-आर्य भाषासमूहामधील हिंदुस्तानी भाषेच्या संस्कृतीकरणामधून हिंदीचा उदय झाला.त्यात हिंदीसह सर्व भाषांवर सर्वाधिक देवभाषा संस्कृतचा प्रभास असल्याचे मानले जाते.भारताच्या उत्तर भागातील आणि मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे.सध्या भारताच्या दिल्ली,उत्तर प्रदेश,हरयाणा,बिहार,झारखंड,मध्य प्रदेश,छत्तीसगड व राजस्थान ह्या राज्यांमध्ये बहुसंख्य हिंदी भाषिक आहेत.त्यावर संशोधन करणे हि बाब महत्वपूर्ण मानली जाते.ती प्रा.ठाकरे यांनी करून दाखवली असल्याचे मानले जात आहे.
प्रा.रवींद्र ठाकरे यांचा पी.एच.डी.पदवी प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालय व संस्थेच्या वतीने विश्वस्त संदीप रोहमारे यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,चासनळी महाविद्यालयाचे प्राचार्य एन.जी.बारे,हिंदी संशोधन केंद्राचे समन्वयक प्रो.डॉ.जिभाऊ मोरे,डॉ.संजय दवंगे व प्रा.सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत यथोचित सन्मान करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी हिंदी संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ.जिभाऊ मोरे म्हणाले की,”डॉ. रवींद्र ठाकरे यांनी ‘बृजेश सिंह की गजलों में पर्यावरण चेतना’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आपला शोधप्रबंध सादर केला होता. त्यांना (डॉ.)अनिता नेरे यांचे मार्गदर्शन लाभले होते.डॉ. रवींद्र ठाकरे हे के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या हिंदी संशोधन केंद्राचे पी.एच.डी.पदवी प्राप्त करणारे दुसरे संशोधक विद्यार्थी आहेत.डॉ.रवींद्र ठाकरे यांनी संशोधनाबरोबरच आपले अनेक शोधनिबंध विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पत्रिकांमध्ये प्रकाशित केले आहेत.ते गेल्या १७ वर्षांपासून महात्मा गांधी विद्यामंदिर, नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात येवला येथे हिंदी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
दरम्यान डॉ.ठाकरे यांच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव अॅड्.संजीव कुलकर्णी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.