आरोग्य
वाढदिवसानिमित्त…या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाट्याजवळ असणाऱ्या कोकमठाण शिवारातील एस.जे.एस.रुग्णालयाचे कार्यकारी संचालक व आर.जे. एस.फाउंडेशनचे सचिव प्रसाद कातकडे यांच्या वाढदिवसानिमित्त ११ एप्रिल रोजी शिर्डी येथील साई सावली अनाथ आश्रमातील लहान मुलामुलींना फळे वाटून त्यांच्या आरोग्याची तपासणी श्री जनार्दन स्वामी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांकडून मोठ्या उत्साहात करण्यात आली आली आहे.
कोपरगाव बेट येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.यात वयोवृद्धापासून ते युवा पिढीने या शिबिराचा लाभ घेतला.या शिबिरात जवळपास पाचशेच्या अधिक लोकांनी लाभ घेतला.शिबिरात मोफत मेडीसिन वाटप करण्यात आले.तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया व इतर उपचार मोफत करण्यात आले आहे.
दरम्यान कोकमठाण येथील गोशाळेतील जनावरांना चारा प्रसाद कातकडे व त्यांच्या सह कुटुंबाच्या हस्ते दान देण्यात आला.त्याच दिवशी सकाळी एस.जे.एस.रुग्णालयातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोफत साईबाबा प्रसादाच्या पॅकेटचे वाटप करण्यात आले आहे.एस.जे.एस.रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून व आर.जे.एस.फाउंडेशन मधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रसाद कातकडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.