पुरस्कार,गौरव
डॉ.गावित्रे यांना दिगदर्शनात फाळके पूरस्कार प्रदान

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील रहिवासी डॉ.अशोक गावित्रे यांना ‘हेरवार्ड पॅटर्न’ या चित्रपटातील सर्वोकृष्ट सामाजिक विषय व दिग्दर्शन या कामगिरीबद्दल देण्यात येणारा ‘दादासाहेब फाळके इंटरनेशनल सिने अवॉर्ड -२०२४’ नुकताच पुणे येथे प्रदान करण्यात आला आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

डॉ.अशोक गावित्रे यांना सर्वोकृष्ट सामाजिक विषय व दिग्दर्शन यासाठी दादासाहेब फाळके इंटरनेशनल सिने अकैडमी बेस्ट डिरेक्टर हा अवॉर्ड देवून सिने अभिनेते दीपक शिर्के व बिगबॉस फेम् तृप्ति देसाई यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे.माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या चित्रपट महोत्सव संचालनालयातर्फे दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तो सादर केला जातो.प्राप्तकर्त्याचा त्यांच्या “भारतीय चित्रपटांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी केलेल्या महान आणि उत्कृष्ट योगदानासाठी” सन्मान केला जातो आणि भारतीय चित्रपट उद्योगातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असलेल्या समितीद्वारे त्याची निवड केली जाते.यात कोपरगाव येथील डॉ.अशोक गावीत्रे यांनी दीड वर्षांपूर्वी ‘हेरवार्ड पॅटर्न’या मराठी चित्रपटासाठी दिगदर्शन केले होते.त्यासाठी हे मानांकन झाले होते.सदर पुरस्कार नुकताच पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला आहे.
याप्रसंगी अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट व सीरियल मधील कलाकारांनी उपस्थिति लावली होती.या कार्यक्रमाचे उद्धघाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री व मराठी तसेच हिंदी चित्रपट स्रुष्टि गाजवणारे अभिनेते दिपक शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
या प्रसंगी बिगबॉस फेम् व सामाजिक कार्यकर्ता तृप्ति देसाई तसेच मोनालिसा बागल,प्रांजलि भालेराव तसेच जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपटाची सम्पूर्ण टीम तसेच अनेक तंत्रन्य उपस्थित होते. याप्रसंगी अनेक कलाकारांचा गौरव करुन पुरस्कार देण्यात आले आहे.
डॉ.अशोक गावित्रे यांना सर्वोकृष्ट सामाजिक विषय व दिग्दर्शन यासाठी दादासाहेब फाळके इंटरनेशनल सिने अकैडमी बेस्ट डिरेक्टर हा अवॉर्ड देवून सिने अभिनेते दीपक शिर्के व बिगबॉस फेम् तृप्ति देसाई यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे.त्यांचे आ.आशुतोष काळे,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,राष्ट्रवाडीचे प्रदेश प्रवक्ते अड्.संदीप वर्पे,वकील संघाचे माजी अध्यक्ष अड्.जयंत जोशी,काँग्रेसचे सचिव नितीन शिंदे,तालुका कालवा कृती समितीचे तुषार विध्वंस,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,सेनेचे संपर्क प्रमुख प्रवीण शिंदे,मराठी नाट्य परिषदेचे सदस्य सुशांत घोडके आदींसह कोपरगाव तालुक्यासह नगर जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.