जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दानपेटी फोडताना चोरटे रंगेहात पकडले,गुन्हा दाखल

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


कोपरगाव शहरातील बाजार तळावरील माता लक्ष्मी मंदिरातील दानपेटी गुरुवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास फोडताना भाविकांनी मनोज मच्छीन्द्र सोळसे व युवराज साळुंके या दोन चोरट्याना रंगेहात पडकले असल्याने खळबळ उडाली आहे.आरोपी दहिगाव बोलका शिवाजीनगर येथील असल्याची माहिती हाती आली आहे.

  

शिवरात्रीच्या गैरफायदा उठवत कोपरगाव येथील बाजार तळ येथील लक्ष्मी माता मंदिरातील दानपेटीवर वक्र दृष्टी ठेवून शिवाजीनगर दहिगाव बोलका येथील आरोपी मनोज मच्छीन्द्र सोळसे (वय-२६) व युवराज साळुंके या दोन चोरट्याना भाविकांनी रंगेहात पडकले असल्याने खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहर आणि तालुक्यात दुष्काळाच्या झळा या वर्षी मोठ्या प्रमाणावर बसणार आहे.त्यामुळे चोरट्यांनी आपापले प्रताप दाखवण्यास सुरुवात केल्याचे आता उघड होऊ लागले असून अशीच एक घटना कोपरगाव शहरात दि.१४ मार्च रोजी रात्री ०७-०८ वाजेच्या सुमारास कोपरगाव बाजार तळ येथे घडली आहे.


   वर्तमानात कोपरगाव शहरात शिवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात सुरु असून गुरु शुक्राचार्य मंदिर,शुक्लेश्वर मंदिर,गावठाणातील प्राचीन शिव मंदिरे,जनार्दन स्वामी समाधी मंदिर,साईबाबा मंदिर आदी ठिकाणी भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करताना दिसत आहे.त्याचा गैरफायदा उठवत मंदिरातील दानपेटीवर वक्र दृष्टी ठेवून शिवाजीनगर दहिगाव बोलका येथील आरोपी मनोज मच्छीन्द्र सोळसे (वय-२६) व युवराज साळुंके या दोन चोरट्याना रंगेहात पडकले असल्याने खळबळ उडाली आहे.आरोपी दहिगाव बोलका शिवाजीनगर येथील असल्याची माहिती हाती आली आहे.

   दरम्यान भाविकांनी त्यांना मंदिरातील दान पेटी फोडून चोरी करताना त्यातील मनोज सोळसे या एकास शहर पोलिसांच्या मदतीने रंगेहात पकडले होते.व याबाबत मंदिर समितीचे अध्यक्ष विकास आढाव यांना खबर दिली होती.त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आपले सहकारी महेश माधव मते व गोरक्ष ज्ञानेश्वर कानडे यांचेसह पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्यात त्यांनी ५००,१००,५०,२०,१० दराच्या नोटा व १,२,५,१० दराची नाणी आदी मिळून ३० हजार ४१३ रुपये आढळून आले आहे.त्यातील आणखी एक आरोपी गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी आपल्या सहकाऱ्यांसंवेत भेट दिली आहे.

  या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी विकास उत्तमराव आढाव (वय-६३) यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा १२४/२०२४ भा.द.वि.४५७,३८०,३४ प्रमाणे दाखल केला आहे.

  दरम्यान या प्रकरणी पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close