पर्यटन व तीर्थक्षेत्र
कोपरगावच्या…या तीर्क्षक्षेत्रांच्या विकासासाठी निधी मंजूर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघातील पौराणिक वारसा असलेल्या मतदार संघातील धर्मिक तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी निधी मिळण्यास यश आले असून त्यात सहा देवस्थानांच्या विकासासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२३-२४ अंतर्गत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाणे तब्बल ३ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव मतदार संघाला मोठी धार्मिक परंपरा असल्यामुळे अनेक गावात असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेले अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत.मात्र मतदार संघातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराच्या विकासासाकडे मागील काही वर्षात दुर्लक्ष झाल्यामुळे या देवस्थानांचा विकास रखडला जावून यात्रा उत्सवाच्या निमित्ताने वर्षानुवर्षांपासून नियमित येणाऱ्या भक्तांना आवश्यक सोयी-सुविधा मिळत नव्हत्या.त्यासाठी आ.काळे यांनी अनेक देवस्थानांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून देवून या तीर्थक्षेत्रांच्या व यात्रा स्थळांच्या विकासाला निधी आणण्यासाठी पर्यटन विभागाकडे पाठपुरावा करीत होते.
मतदार संघातील माहेगाव देशमुख येथील अमृतेश्वर महादेव मंदिर येथे सभामंडप बांधकाम व परिसर सुशोभिकरण करणे (५० लक्ष),मौजे कोळपेवाडी येथील महेश्वर मंदिर येथे सभामंडप बांधकाम व परिसर सुशोभिकरण करणे (५० लक्ष), वारी येथील रामेश्वर मंदिराच्या विकासासाठी (६४.५० लक्ष),ब्राम्हणगांव येथील श्री.जगदंबा माता देवस्थान मंदिर व परिसर सुशोभिकरण करणे (५० लक्ष),चांदेकसारे येथील भैरवनाथ देवस्थान मंदिर परिसर सुशोभिकरण करणे (५०लक्ष), मतदार संघातील राहाता तालुक्यातील वाकडी येथील खंडोबा मंदिर देवस्थान मंदिर परिसर सुशोभिकरण करणे (३५.५० लक्ष) असा एकूण ३ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या निधीतून तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी मंदिरापर्यंत रस्ते,पाणी पुरवठ्याची व्यवस्था,स्वच्छतागृह,शौचालय,रस्त्यावरील दिवे आणि संरक्षण भिंत,वृक्ष लागवड व परिसर सुशोभिकरण यासारखे अनेक कामे होणार आहे.त्यामुळे या तिर्थक्षेत्रांना भेटी देणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढ होवून त्या त्या गावातील व्यवसाय वृद्धी होवून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आ.काळे यांचे आभार मानले आहे.