कोपरगाव तालुका
…या तालुक्यात विविध विकास कामांचे उदघाटन संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मागील काही वर्षापासून कोपरगाव मतदार संघातील प्रलंबित असणारा रस्त्यासंह विविध विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यात आ.आशुतोष काळे यांना यश येत असून त्यांच्या स्थानिक निधीतून चासनळी,हंडेवाडी व कुंभारी येथील विकास कामांचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात नुकतेच संपन्न झाले आहे.

दरम्यान यामध्ये कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे २ कोटी रुपये निधीतून मंजूर गाव ते बक्तरपूर रस्ता डांबरीकरण करणे,तसेच कुंभारी येथे ५० लक्ष रुपये निधीतून श्री राघवेश्वर मंदीर सुशोभीकरण करणे, हंडेवाडी येथे ४० लक्ष रुपये निधीतून रा.मा.७ हंडेवाडी फाटा ते एकनाथ तिरसे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे,६५ लक्ष रुपये निधीतून भास्करराव तिरसे वस्ती ते हंडेवाडी गाव रस्ता डांबरीकरण करणे,२० लक्ष रुपये निधीतून ग्रा.मा.२५ ते वडाची वाडी ते कारवाडी रस्ता डांबरीकरण करणे,आणि चासनळी येथे २ कोटी रुपये निधीतून मंजूर गाव ते बक्तरपूर रस्ता डांबरीकरण करणे आदी कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

सदर प्रसंगी परमपूज्य श्री राघवेश्वरनंदगिरी महाराज,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ.मच्छिन्द्र बर्डे,सचिन चांदगुडे,संचालक श्रीराम राजेभोसले,माजी संचालक मिननाथ बारगळ,भिकाजी सोनवणे,सोमनाथ घुमरे,गोदावरी खोरेचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे,सुभाषराव कदम,गौतम बँकेचे संचालक श्रीकांत तिरसे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गाडे,सोशल मीडिया सेलचे सरचिटणीस सुनील गाडे,गौतम बँकेचे संचालक सुनील डोंगरे,रामराव साळुंके,सोपानराव ठाणगे,चंद्रकांत बढे,रविंद्र चिने,लक्ष्मण बढे,अण्णासाहेब बढे, दिगंबर बढे,सतिश कदम,सुभाष बढे,किरण बढे,दिनेश साळुंके,प्रभाकर कांगणे,अशोक माळी,भीमराज केदार,ज्ञानेश्वर चांदगुडे,चिंधु गरुड,बाळासाहेब ठाकरे,सोमनाथ सानप,विकास चांदगुडे,गणेश नागरे,गणेश सानप, भागीनाथ धेनक,शरद गरुड,बापू कासोदे,गणेश वराडे,धनंजय वारुळे,आकाश कदम,मच्छिन्द्र ठाणगे,बाबासाहेब काशिद,कैलास कबाडी,दत्तात्रय कदम,निलेश कदम,निलेश बढे,सागर कदम,सुनील चंदनशिव,निलेश बढे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान कोपरगाव तालुक्यातील विविध गावात होत असलेल्या पायाभूत विकास कामाबाबत ग्रामस्थानीं समाधान व्यक्त केला आहे.



