आंदोलन
शेतकऱ्यांचा श्रीरामपूर मधील,’ट्रॅक्टर मोर्चा’ गाजणार !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
शेतकऱ्यांच्या कृषी मालाला किमान आधारभूत किंमती (एम.एस.पी)च्या कायदेशीर हमीबद्दल शेतकऱ्यांच्या,’दिल्ली चलो’आंदोलनाला देशभरातून पाठींबा लाभत असून कर्जमाफीचा पाठिंबा,एम.एस.पी.कायदा आणण्यात अवास्तव विलंब झाल्यामुळे संतप्त अ.नगर जिल्ह्यातील नेवासा येथील सिफाचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील व प्रहारचे आ.बच्चूभाऊ कडू आणि शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या नेतृत्वात शेतकरी उद्या दि.२७ फेब्रुवारी रोजी नेवासा येथून श्रीरामपूर येथील प्रांत कार्यालयावर थेट ट्रॅक्टर रॅली काढत असून त्यास मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळत असल्याच्या बातम्या हाती आल्या आहेत.
आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्या असून,पंजाब हरियाणातील हे शेतकरी आता दिल्लीकडे कूच करीत आहेत.त्यामुळे हे आंदोलन आता पंजाब,हरियाणासह उत्तरेतील अनेक राज्यांसह महाराष्ट्रातही पसरण्याची शक्यता वर्तवली जात असून ती खरी होताना दिसत आहे.दरम्यान या शेतकऱ्यांना दिल्लीच्या बाहेर रोखून सरकार त्यांना तेथून परतून रावण्याच्या प्रयत्नात असताना या आंदोलनाची व्याप्ती वाढताना दिसत आहे.पंजाब पोलिसांनी शेतकऱ्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला.या आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या असून यात एका तरुण शेतकऱ्याचा बळी गेला आहे.त्यामुळे हे आंदोलन आता आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.सरकार त्यांना चर्चेसाठी निमंत्रण देत असले तरी त्यात गंभीरता दिसत नाही त्यामुळे त्यात वेगळे काही साध्य होण्याची शक्यता नाही केवळ आगामी निवडणूका काढण्यासाठी चलढकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्याचे पडसाद आता महाराष्ट्रसह राजस्थान,मध्यप्रदेश आदी राज्यातही उमटताना दिसत आहे.उत्तर नगर जिल्ह्यात या विरुध्द रघुनाथ दादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने अड्.अजित काळे यांच्या नेतृत्वात नूतकेच लाक्षणिक उपोषण करून पाठींबा दिला होता.आता तर थेट नेवासा येथून श्रीरामपूर येथील प्रांत कार्यालयावर ‘ट्रॅक्टर रॅली’ काढताना दिसत असून त्यासाठी मोठी तयारी झाली असल्याचे दिसत आहे.त्यासाठी गावोगावचे शेतकरी वर्गणी करून ट्रॅक्टर पाठविण्यासाठी प्रयत्नशील आहे.त्यामुळे प्रशासन त्यांना पंजाब-हरियाणातिल अंदोलनासारखे बाहेर रोखण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान या आंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या कृषी मालाच्या किमान आधारभूत किंमती(एस.सम.पी.)च्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे; तरच शेतकरी वाचणार आहे.त्यासाठी शेतकऱ्यांनीं हजारोंच्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल औताडे,प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे,तालुकाध्यक्ष युवराज जगताप,संघटक शिवाजी जवरे,निळवंडे कालवा कृती सामितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले,सचिव कैलास गव्हाणे,बाबासाहेब गव्हाणे,संघटक नानासाहेब गाढवे,कोपरगाव शेतकरी कृती समितीचे कार्यकर्ते प्रवीण शिंदे,तुषार विध्वंस,संतोष गंगवाल आदींनी केले केले आहे.
या प्रकरणी आपमच्या प्रतिनिधीने शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”शेतकऱ्यांना अनुदानापेक्षा शेतमालासाठी निर्यात खुली करणे सह डॉ.एस.एस.स्वामीनाथन यांच्या शिफारशी लागू करणे गरजेच्या आहेत तरच शेतकरी जगणार आहे.सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते त्याचा सरकारला विसर पडला आहे.सरकार फुकट खाणारांची तोंडे वाढवत असून अन्नधान्य पिकवणाऱ्यास मात्र उपाशी मारत आहे.हि बाब खेदजनक असल्याची संतप्त प्रतिक्रिया नोंदवली आहे.