निवड
आदर्श ग्रामसेवक पुरस्कार…या ग्रामसेवकांना प्रदान

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अ.नगर जिल्हा परिषदेच्या वतीने मानाचा समजला जाणारा सन-२०१८-१९ चा “आदर्श ग्रामसेवक ” करंजीचे ग्रामसेवक एस.के.राजपूत यांना तर सन २०१९-२०चा संवत्सरचे ग्रामसेवक कृष्णा अहिरे,तर सन-२०२०-२१ चा पुरस्कार शिंगणापूर चे ग्रामविकास अधिकारी अविनाश पांगरे यांना तर सन-२०२१-२२ चा पुरस्कार सांगवी येथील ग्रामसेवक योगेश देशमुख यांना राज्याचे महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अ.नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत विभागातील पाच वर्षातील ५५ यांच्या पुरस्काराची घोषणा केली असून यात कोपरगाव तालुक्यातील चार ग्रामसेवक यांचा समावेश असून त्यात एस.के.राजपूत,कृष्णा अहिरे,अविनाश पगारे,योगेश देशमुख आदींचा समावेश आहे.पुरस्कार विजेत्या ग्रामसेवकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अ.नगर जिल्ह्यातील गावांचा विविध योजना राबवून कायापालट करून नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणा-या कल्पक ग्रामसेवकांची सेवा पाहून त्यांचे गुणांकन करून ‘आदर्श पुरस्कार’ दिला जातो.गत पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागांतर्गत रखडलेल्या पुरस्काराला अखेर मुहूर्त मिळाला आहे.शहरातील भिस्तबाग येथे पार पडलेल्या पर्यटन सांस्कृतिक कार्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महासंस्कृती महोत्सव कार्यक्रमात जिल्हा परिषदेचा,’आदर्श ग्रामसेवक पुरस्कार’ वितरण सोहळा पार पडला.

राज्यातील ग्रामीण भागात स्मार्टग्राम योजना राबवण्यात येत आहे.सन २०१६ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. त्यात ग्रामपंचायती सहभाग घेतात.तालुका व जिल्हा या दोन पद्धतीने स्मार्ट गावांची निवड केली जाते.तालुका स्तरावर निवडण्यात आलेल्या गावांना पुरस्कार म्हणून १० लाख रुपये निधी देण्यात येतो.या निधीतून गावांत विविध विकासकामे सुरू करता येतात.यात कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायतीसह सडे ग्रामपंचायतीचा समावेश असल्याची माहिती गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
सदर यावेळी दक्षिण नगरचे खा.डॉ.सुजय विखे,शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.सदाशिव लोखंडे,जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,नगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

अ.नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत विभागातील पाच वर्षातील ५५ यांच्या पुरस्काराची घोषणा केली असून नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण नुकतेच केले आहे.त्यात करंजी येथील ग्रामसेवक एस.के.राजपूत यांची निवड झाली होती.या खेरीज संवत्सर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कृष्णा अहिरे यांना सन-२०१९-२० चा पुरस्कार प्राप्त झाला आहे.तर सन-२०२०-२०२१ चा पुरस्कार शिंगणापूरचे ग्रामविकास अधिकारी अविनाश पगारे यांना जाहीर झाला आहे.तर सन-२०२१-२२ चा पुरस्कार सांगवीचे ग्रामसेवक योगेश देशमुख यांना प्रदान करण्यात आला आहे.तो नुकताच पालक मंत्री राधाकृष्ण विखे व शालिनी विखे यांनी मोठ्या उत्साहात दिला आहे.
यशस्वी पुरस्कार विजेते ग्रामसेवक यांचे आ.आशुतोष काळे,माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे,कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती पूर्णिमा जगधने,माजी उपसभापती अर्जुन काळे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,विस्तार अधिकारी बबनराव वाघमोडे,तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच,कोपरगाव तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष दिगंबर बनकर,माजी अध्यक्ष गोरक्षनाथ शेळके,जालिंदर पाडेकर,दिलीप वारकर,डी.बी.गायकवाड,बाबासाहेब गुंड,सतीश दिघे,आर.पी.सय्यद,जी.एस.नेवगे आदींनी अभिनंदन केले आहे.