विशेष दिन
..या गावात,’प्रजासत्ताक दिन’ उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायतीच्या वतीने काल सकाळी ०८.१५ वाजेच्या सुमारास मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन सरपंच देवयानी प्रशांत घुले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

कुंभारी ग्रामपंचायत ध्वजारोहणानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच देवयानी घुले यांच्या अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात ग्रामसभा संपन्न झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.याला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर इ.स.१९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स.१९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले.जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर इ.स.१९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची घोषणा केली होती.त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते.भारताचे राष्ट्रगीत गाऊन आदर व्यक्त केला जातो.कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

या प्रसंगी उपसरपंच दिलीप वामन ठाणगे.ग्रामपंचायत सदस्य कविता निळकंठ,रंजनाबाई गायकवाड,राहुल पवार,रामराव चंदनशिव,वैशाली बडे,मनीषा घुले,ज्योती अहिरे,अनिकेत कदम,संजय ठाणगे,नाना पवार,रंजना वरुळे,श्रीकृष्ण पैठण,शिवाजीराव घुले,सोपन ठाणगे,पोपट निळकंठ,सहखारी देवकर,त्र्यंबक वाघ,गोपीनाथ निळकंठ,सोपान चिने,अर्जुन घुले,विकास वाघ,राहुल निळकंठ,गीताराम ठाणगे,सुभाष बडे,वसंत घुले,राम घुले, ललित निळकंठ,भास्कर भारती,विलास वाघ,नितीन मोहरे,प्रमोद चिने,मसु पवार,माधव चंदनशिव,शिवाजी थोरात,पुंडलिक थोरात,’श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठाण’चे अध्यक्ष तसेच माजी लोकनियुक्त सरपंच प्रशांत घुले,अभिजीत चकोर, अतुल निळकंठ,अमोल कोकाटे,ज्ञानेश्वर पवार,योगेश ठाणगे,नाना डांगे,कृष्णा घुले,आकाश वाघ,गणेश निळकंठ,नाना काशीद,विकास खळे,राजेंद्र तासकर,तंटा मुक्ती अध्यक्ष शंकरराव शेळके,ग्रामसेवक कहार भाऊसाहेब , प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॕक्टर अजय अनारसे,जि.प.प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक जगदाळे गुरुजी,बडे वस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री मेंगाळ आदींसह मोठे संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर प्रसंगी जिल्हा परिषद शाळेचा ध्वजारोहण कुंभारी ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिलीप वामन ठाणगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी ‘श्री साई राघवेश्वर प्रतिष्ठान’च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.तसेच रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी श्री काळे,श्री म्हेत्रे,सौ.गायके यांच्या ग्लोबल फाउंडेशन संस्थेमार्फत गरजूवंत विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले.तसेच ‘रोटरी क्लब ऑफ क्लब’ यांच्यावतीने श्री कापडिया यांच्याकडून एल.ई.डी.दूरदर्शन संच शाळेसाठी देण्यात आला आहे.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.
त्यावेळी ध्वजारोहणानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात ग्रामसभा संपन्न झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.