विशेष दिन
…या संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे.

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.याला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर इ.स.१९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स.१९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले.
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त शैक्षणिक संकुलाच्या मैदानावर ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास संस्थानचे प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे,उप कार्यकारी अभियंता संजय जोरी,लेखाधिकारी कैलास खराडे,संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी,सर्व विभाग प्रमुख,कर्मचारी तसेच शैक्षणिक संकुलातील शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे बोलताना म्हणाले की,”प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना स्वातंत्र्य सैनिकांना सुरवातीस अभिवादन करतो.
तसेच त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”शिर्डी मध्ये श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या साई भक्तांना अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.श्री साईबाबांचे दर्शनानंतर साईभक्त श्रद्धेने देणगी देत असतात साईभक्तांनी दिलेल्या देणगीतून संस्थानचे विविध प्रकल्प जसे रूग्णालय,प्रसादालय,शैक्षणिक संस्था,निवासस्थान व्यवस्था आणि व्यवस्थापन खर्च या देणगीतून करणे शक्य होत आहे.यासर्व देणगीदार साई भक्तांचेही मी या निमित्ताने आभार मानतो.श्री साईभक्तांची सेवा हिच श्री साईंची सेवा या भावनेतून सर्वांनी साईभक्तांना सेवा द्यावी असे आवाहन केले.

सदर प्रसंगी संस्थानच्या संरक्षण विभाग,फायर अॅण्ड सेफ्टी,सुरक्षा एजन्सीज,शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी आदिंनी आकर्षक परेड व कवायती सादर केल्या.तसेच श्री साईबाबा कन्या विद्या मंदीरच्या विद्यार्थीनींनी तायक्वांदो कराटेचे प्रत्यक्षीक सादर केले.
यासाठी आमच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून श्री साईभक्तांना संस्थानमार्फत चालविण्यात येणारे प्रकल्प व संस्थानचे प्रस्ताावित प्रकल्प याबाबत माहिती देण्यात येत आहे.श्रींचे दर्शनासाठी येणा-या साईभक्तांना संस्थानमार्फत नव्याने सुरू झालेल्या सुसज्ज अशा दर्शनरांगेमुळे आरामदायी दर्शन घेण्याचा लाभ मिळत आहे. याशिवाय शिर्डी व शिर्डी परीसरातून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरीता सुसज्ज अशी नवीन शैक्षणिक संकुलाची इमारत बांधून पूर्ण करण्यात आलेली असून लवकरच ही इमारत नवीन शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी वापरात येणार असलेबाबत सांगीतले.साई संस्थान कर्मचाऱ्यांचे खूप दिवसापासून प्रलंबित असलेले काही जिव्हाळ्याचे विषय जसे सेवाप्रवेश नियम,कर्मचारी वाहतूक भत्ता यासारखे प्रश्न मार्गी लागले असून,संस्थान कायम आणि कंत्राटी कर्मचारी यांना गणवेश देण्याचा प्रस्तााव समितीने मंजूर केलेला आहे आणि त्याबाबत लवकरच गणवेश देणे बाबतची कारवाई देखील आता करण्यात येणार असल्या बाबत सांगीतले.नुकत्याच पार पडलेल्या आयोध्या येथील श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठेकरीता मला श्रीसाईबाबा संस्थानचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याची आपल्या सर्वांचे सहकार्याने संधी मिळाली याबद्दल आभार मानले.यापुढे देखील साईभक्तांचे सेवेत अधिकारी कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी आणि शिक्षक प्रयत्नशिल राहतील असे आश्वासित केले आहे.
सदर प्रसंगी संस्थानच्या संरक्षण विभाग,फायर अॅण्ड सेफ्टी,सुरक्षा एजन्सीज,शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी आदिंनी आकर्षक परेड व कवायती सादर केल्या.तसेच श्री साईबाबा कन्या विद्या मंदीरच्या विद्यार्थीनींनी तायक्वांदो कराटेचे प्रत्यक्षीक सादर केले.त्यानंतर शैक्षणिक संकुलातील राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर विशेष यश संपादन केलेल्या खेळाडूंना संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व स्मृती चिन्ह देण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अध्यापक राजेंद्र कोहकडे यांनी केले.

शिर्डी उप विभागीय अधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
दरम्यान शिर्डी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात तहसिलदार अमोल मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे.
सदर प्रसंगीशिर्डी लोकसभा मतदार संघाचे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे,पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह कार्यालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.