धार्मिक
संत परोपकारासाठी असतात-…या महाराजांचे प्रतिपादन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जगात संत जनसामान्यांच्या परोपकारासाठी असतात असे सांगून त्यांनी त्रास देणाऱ्या जनतेला सुद्धा संत ज्ञानेश्वरांनी पसायदानाची रचना केल्याचे प्रतिपादन संत मुक्ताई ज्ञानपीठाचे ह.भ.प.उत्तम महाराज गाडे यांनी नुकतेच जवळके येथील कार्यक्रमात बोलताना केले आहे.
एकीकडे प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली होती तर दुसरीकडे कोपरगावसह देशभरात विविध संघटनांनी प्रभू श्रीरामाच्या मंदिर स्थापना दिनी विविध कार्यक्रमाचे मोठया उत्साहात आयोजन केल्याचे दिसून आले आहे.कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र जवळके येथे भजनीं मंडळ व ग्रामस्थांचे वतीने पुणतांबा येथील संत मुक्ताई ज्ञानपीठ आश्रमातील ह.भ.प.उत्तम महाराज गाडे यांचे हरी कीर्तन आयोजित केले होते त्यावेळी ते बोलत होते.
त्यावेळी त्यांनी,”देव बैसले सिंहासनी । आल्या याचका होय धनी ।।२।। एकाच्या कैवाडे । उगवे बहूतांचे कोडे ।।३।। हा संत तुकारांमाचा अभंग किर्तनास घेतला होता.त्यावेळी ते बोलत होते.सदर प्रसंगी जवळके,धोंडेवाडी आणि परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आई-वडील यांच्या निर्वाणाचा प्रसंग वर्णन केला आहे.यावेळी लोकांनी त्रास दिला.त्यांना दिक्षा देण्यास नकार दिला संत परोपकारासाठी असतात असे सांगून त्यांनी त्रास देणाऱ्या जनतेला पसायदानाची रचना केल्याचे सांगितले आहे.
त्यावेळी त्यांनी संस्काराचे महत्व वर्णन करताना छत्रपती संभाजी महाराज यांचा औरंगजेबाने अटक करून त्याच्या समोर हजर केल्यावर दिलेले उत्तर देऊन असे पुत्र जन्माला घालण्याचे काम करून संस्कार करण्याचे आवाहन केले आहे.आळंदी येथील सोहम या विद्याथ्याचे उदाहरण देऊन नऊ वर्षाचा असताना अख्खी ज्ञानेश्वरी पाठ असल्याचे सांगून गर्भाचे संस्कार किती महत्वाचे आहे हे आपल्या रसाळ वाणीतून स्पष्ट केले आहे.
त्यांनी उपस्थित भाविकांना संस्काराचे महत्व प्रतिपादन करताना व्यसनांच्या आहारी नवीन पिढीस जाऊ देऊ नका असे आवाहन करून आई-वडिलांची सेवा करा शिक्षण करा,धर्माची सेवा करा.आई-वडीलच आपले तीर्थ आहे.तीर्थाला जाऊ नका पण त्यांची सेवा करा असे आवाहन शेवटी केले आहे.आपली शाळा आणि मातृभूमी कधीच विसरू नका.शाळा तुम्हाला शिकून मोठी करते तुम्ही आपल्या शाळेस आणि गावास मोठ्या पदावर रुजू झाल्यावर गरजूंची मदत व त्या गरजूंना दान करा असे आवाहन उपस्थित भाविकांना केले आहे.सदर किर्तन प्रसंगी उपस्थित भाविकांना ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते.