जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

तरुणास १.४० कोटीस फसवले,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव शहरातील कर्मवीर नगर येथील रहिवासी असलेल्या तरुणास विविध सरकारी कामांचा ठेका देतो या सबबी खाली सन-२०१८ पासून वेळोवेळी विविध रकमा घेऊन सुमारे १.४० कोटींची फसवणूक केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात न्यायालयीन आदेशाने साईबाबानगर मालेगाव येथील आरोपी भरत उदयसिंग परदेशी याचे विरुद्ध फिर्यादी भावेश रामचंद्र थोरात (वय-३५) याने गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

 

दरम्यान २२.४५ लाखांची फसवणूक कमी झाली की काय त्या नंतर आरोपीने,”०८ दिवसात दुसरे काम सुरु करतो व तुझे पैसे काढून देतो” असे म्हणून विश्वास संपादन करून दुसरा बहाणा करून विशाखापट्टणम येथे घेऊन गेला व सरकारी इमारतीस रंग देण्याचे काम देतो असे आश्वासन देऊन ३० लाख रुपयांना डल्ला मारला आहे.

आपल्या दररोजच्या बोलण्यातही कोणी फसवणूक केली,बनवेगिरी केली असेल तर ‘चारसो बीस’ असा उल्लेख सहज केला जातो.एखादी व्यक्ती फसवेगिरी करणारी असेल याची माहिती असेल तर तिच्याबद्दल सांगताना एकदम ‘चारसोबीस माणूस’ आहे,असं सांगितलं जातं.हे भा.द.वि. कलमच आहे ४२०.भारतीय दंड संहितेत फसवेगिरीच्या गुन्ह्यासाठीच्या कलमाला ४२० हा क्रमांक देण्यात आला आहे.हिंदी चित्रपटामधून किंवा कथा,कादंबऱ्यांमधून या कलमांचा सर्रास उल्लेख होत असतो.या कलमाचा अर्थ सांगणारा ‘श्री ४२०’ हा राज कपूरचा चित्रपट काही वर्षांपूर्वी खूप गाजला होता.तेव्हापासून हा शब्द आणखीनच प्रचलित झाला.अशीच सुमारे १.४० कोटी रुपयांची फसवणुकीची घटना नुकतीच कोपरगाव शहरातील कर्मवीर नगर येथे घडली आहे.

 

यातील आरोपी भरत परदेशी हा मालेगाव येथील रहिवासी असून व फिर्यादी भावेश थोरात कर्मवीर नगर येथील रहिवासी आहे.त्यांची त्यांच्या मित्रांच्या मार्फत ओळख झाली होती.त्यातून सदर तरुण कच्चे मडके असल्याचे ओळखून आरोपी परदेशी याने बड्या बड्या नेत्यांची ओळख व उठबस असल्याचा बनाव करून आपण मोठमोठे व्यवसाय करत असल्याचे सांगून फिर्यादीवर प्रभाव निर्माण केला होता.त्यातून थोरात याचा विश्वास संपादन करून त्या व्यवसायातून आपल्याला करोडो रुपये मिळत असल्याचे त्याने सांगून नवीन मित्र भावेश थोरात यालाही आपण फायदा करून देऊ शकतो असे मधाचे बोट दाखवले होते.त्यास बळी पडून भावेश थोरात याने पुणे शहरातील हवेली तालुक्यात एल.अँड.टी.कंपनीचे नळ बसविण्याचा ठेका देतो या नावाखाली त्याकडून दि.२३ एप्रिल २०१९ रुपये ०१ लाख,२६ एप्रिल ०१ लाख,०५ मे रोजी ०१ लाख,१३ मे  रोजी ३० हजार,०७ जून ०१ लाख,२८ जून रोजी ५० हजार,२० जुलै रोजी ०१ लाख,२३ जुलै रोजी ०१ लाख,०३ ऑगष्ट रोजी ०२ लाख,२४ ऑगष्ट रोजी ०२ लाख,२४ ऑगष्ट रोजी ०२ लाख,१० सप्टेंबर रोजी ०२ लाख,३० ऑक्टोबर रोजी दोनदा ०२ लाख बँकेतून,१५ सप्टेंबर रोजी १.५० लाख,असे सन-१०१९ साली एकूण २२ लाख ४५ हजार रुपये लुबाडले होते.

दरम्यान हे कमी झाले की काय त्या नंतर आरोपीने,”०८ दिवसात दुसरे काम सुरु करतो व तुझे पैसे काढून देतो” असे म्हणून विश्वास संपादन करून दुसरा बहाणा करून विशाखापट्टणम येथे घेऊन गेला व सरकारी इमारतीस रंग देण्याचे काम देतो असे आश्वासन दिले होते व पूर्वीची रक्कम मिळवून देतो असे सांगून व त्यातून पुन्हा एकदा मुथ्था नामक मित्राची फर्म ‘कृषी मित्र ऍग्रो’ या खात्यावरून  ०८ लाख रुपयांना डल्ला मारला असल्याचे उघड झाले आहे.मात्र एकही रुपया दिला नाही.एवढे कमी की काय त्याने पुन्हा एकदा,” सोलरचे काम  मिळवून देतो” असा विश्वास फिर्यादिस थोरात यास दिला होता.व केंद्रीय मंत्र्यांकडे नेऊन व केबिन बाहेर बसवून मोठी ओळख असल्याचे सांगून व नादी लावून पुणे,सातारा,सांगली,नाशिक येथील व्हेन्डर जमा करण्यास सांगून आरोपीचे खात्यावर ३० लाख जमा करण्यास सांगितले होते.एवढी मोठी रक्कम देऊनही त्याने कुठलेही काम फिर्यादी थोरात यास दिले नाही हे विशेष ! व फरार झाला होता. त्यानंतर फोन उचलणे बंद केले होते.आरोपीचा पाठलाग करून घरी जाऊन तो भेटत नसे.मात्र मोठा पाठपुरावा करून त्याने सहा महिन्यानंतर १७ लाख रुपयांची मागणी केली होती.दि.०६ नोव्हेंबर २०२० रोजी एक करार करून दिला होता.त्यास बळी पडून फिर्यादीने पुन्हा एकदा आरोपीच्या खात्यावर १७ लाख रुपये वर्ग केले होते.त्या पोटी बनावट शिक्के व कागदपत्र वापरून फसवणूक केली आहे.

  दरम्यान त्यानंतर पुन्हा एकदा सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आला असून त्या रेशन कार्ड प्रोजेक्ट चे काम देतो असे सांगून व गोडगोड बोलून त्याकडून आणखी एकदा ४० लाख रुपये जमा करायला लावले होते.त्यानंतर ४-५ महिन्यात एकही काम दिले नाही.

  दरम्यान पुन्हा एकदा फास टाकून त्याने फिर्यादिस करारनामा करून दिला व राज्यात महामार्गावर पोल बसवून त्यावर सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसवून द्यायचे आहे.असा नवा बनाव तयार केला व त्या बाबत ०२ कोटी ८६ लाख ८५ हजार ८०० रुपयांचे कँमेरे,पोल,नाटबोल्ट असे साहित्य दिले होते.व तसा करारनामा करून दिला होता.त्या बदल्यात आरोपीने फिर्यादी कडून पुन्हा एकदा ५० लाख रुपयांचा गंडा घातला होता.त्यानंतर त्यातील २० लाख रुपये मालेगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या विविध दोन धनादेशद्वारे (क्रं.१३१६७९ व १३१६७८) त्याने दिले आहे.मात्र ०१ कोटी ४० लाख रुपयांची फसवून केली असल्याचा गुन्हा आधी कोपरगाव येथील न्यायालयात दखल करून तो कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.

  दरम्यान या प्रकरणी फिर्यादी भावेश थोरात याने आरोपी भरत परदेशी याचे विरुद्ध १६ जानेवारी रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.१४/२०२४ भा.द.वि.कलम ४०६,४२०,४६८,४७१,४७२  प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
  
    दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.

    या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close