क्रीडा विभाग
स्पर्धेत यशासाठी मनात जिद्द आणि प्रतिबद्धता,गांभीर्य आवश्यक-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शरीर सौष्ठवचे वेड अनेकांना असते.मात्र अतिशय कमी व्यक्ती शरीरसौष्ठव विकसित करण्यात यशस्वी होतात.त्यामुळे शरीर सौष्ठव मिळवायचे असेल तर मनात जिद्द,चिकाटी आणि सहनशीलता असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
सर्वोत्कृष्ट शरीरसौष्ठवाच्या व्यक्तीची निवड करून त्याचा पुरस्कारपूर्वक गौरव करण्याची स्थानिक,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाणारी स्पर्धा.शरीरसौष्ठव म्हणजे मानवी शरीराचा सुडौल आणि सुबद्ध आकार होय.त्याच्या स्पर्धा घेऊन तरुणांना प्रोत्साहित केले जात आहे.अशीच स्पर्धा कोपरगाव तालुका बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांनी आयोजित केली असून त्याचे नाव त्यांनी ‘छत्रपती श्री २०२४ टायटल’ असे दिले आहे.त्या स्पर्धेचे आ.काळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कोपरगाव तालुका बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे तालुकाध्यक्ष शरद खरात,उपाध्यक्ष ऋषिकेश आढाव, उपाध्यक्ष डॉ.दिपक पगारे,कौस्तुभ वाघे,प्रदीप कांबळे,बाळासाहेब घेर,अस्लम शेख,अमीन सय्यद,राहुल पहीलवान, आदींसह पोलीस उपनिरीक्षक बोबडे,माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,भरत मोरे, दिपक विसपुते,आकाश नागरे,मुन्ना मन्सूरी,दिपक वाजे सहभागी स्पर्धक व नागरिक उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”मानवी शरीराचा डौलदार व प्रमाणबध्द आकार म्हणजेच शरीर सौष्ठव.परंतु तरुण कमी वेळात पिळदार शरीर बनवण्यासाठी व शरीर सौष्ठव स्पर्धेत अव्वल येण्यासाठी तरुणांकडून स्टेरॉईडचा वापर होत आहे ही बाब चिंताजनक असून अनेकांना या औषधांच्या दुष्परिणामांची पुसटशी कल्पनाही नसते त्यामुळे जीम प्रशिक्षकांनी अशा तरुणांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगितले.अनेक तरुण पीळदार शरीर बनवण्याचे स्वप्न बघतात आणि स्टेरॉइडच्या विळख्यात अडकतात.त्यामुळे पिळदार शरीर गरजेचे असले तरी सुद्रृढ शरीराचं स्वप्न उराशी बाळगावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.