जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

घड्याळाचे गौडबंगाल…-कोपरगावात चौकशीची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


कोपरगाव नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीवर बसविण्यात आलेले मात्र जुनी इमारत पडल्यावर गायब झाल्यावर सदर घड्याळ कोपरगाव नगरपरिषदेने शोधून नियोजित जागेवर बसवावे न सापडल्यास दोषींवर कारवाई करावी अशी मागणी कोपरगाव शहरातील कार्यकर्ते संतोष गंगवाल व इतर कार्यकर्त्यानी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांचेकडे नुकतीच केली आहे.

  

कोपरगाव नगरपरिषद स्थापन झाल्यावर त्यांच्या इमारतीवर असेच कालदर्शनासाठी एक मोठे घड्याळ बसविण्यात आले होते.त्यामुळे शहरातील व्यापारी,नागरिक,शहरात येणारे ग्राहक त्याचा वापर वेळ पाहण्यासाठी करत असत.मात्र सदर घड्याळ नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीच्या जागी नवी वाचनालयाची इमारत बांधली गेल्यावर मात्र गायब झाल्याची या नागरिकांची तक्रार आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”घड्याळ हे काल मापनासाठी वापरले जाणारे उपकरण आहे.पुरातन काळी लोक सूर्याची आकाशामधील जागा पाहून वेळ ठरवत असत.त्यानंतर अगदी इ.स.पूर्व २५० पासून कालमापनाचे पुरावे आढळतात.भारतात घटिकापात्र अनेक शतकांपासून वापरात होते,पण त्यात त्रुटी होत्या.जसे ते पाण्यात ठेवावे लागत असे.पाण्यात ठेवल्यानंतर घटकाभराने ते भरून बुडले म्हणजे ‘एक घटिका झाली’ असे मोजले जात असे.घड्याळाचा शोध लावण्यासाठी गॅलीलिओने लावलेला लंबकाच्या आवर्तनांना ठराविकच वेळ लागतो हा शोध महत्त्वाचा ठरला. लंबकाच्या या गुणाचा उपयोग घड्याळाचे नियमन करण्यासाठी केला गेला.त्यानंतर अचूक वेळ दाखवणारी लंबकाची घड्याळे प्रचारात आली.कोपरगाव नगरपरिषद १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्थापन झाल्यावर त्यांच्या इमारतीवर असेच कालदर्शनासाठी एक मोठे घड्याळ बसविण्यात आले होते.त्यामुळे शहरातील व्यापारी,नागरिक,शहरात येणारे ग्राहक त्याचा वापर वेळ पाहण्यासाठी करत असत.मात्र सदर घड्याळ नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीच्या जागी नवी वाचनालयाची इमारत बांधली गेली मात्र त्या दरम्यान सदर घड्याळ गायब झाल्याची या नागरिकांची तक्रार आहे.त्यांनी याबाबत माहिती अधिकारात मागणी करूनही सदर घड्याळ सापडत नसल्याची माहिती आहे.त्यामुळे हा ऐत्याहसिक वारसा असल्याचा तक्रारदारांचा दावा आहे.सदर घड्याळ त्यावेळच्या पालिका पदाधिकारी यांनी मुंबई येथे खास आदेश देऊन बनवून घेतले होते.तो शहर वासीयांसाठी मोठा ठेवा असल्याचा दावा करून त्यांनी हा ठेवा नगरपरिषदेच्या प्रशासनाच्या नादाणीपणामुळे गायब झाला असल्याचा आरोप केला आहे.व सदर घड्याळ शोधून पूर्ववत ठिकाणी बसवून दयावा अशी मागणी नुकतीच जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या कोपरगाव दौऱ्याच्यावेळी यांचेकडे केली आहे.

सदर प्रसंगी तुषार विध्वंस,संतोष कासलीवाल,सुनील फंड,विकास आढाव,योगेश गंगवाल,अनिल गायकवाड आदींच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close