जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
महसूल विभाग

वाळू धोरण फसले ! नागरिक हैराण !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

अ.नगरसह कोपरगाव तालुक्यात सरकारी वाळूचे ६०० रुपये ब्रास हे नागरिकांसाठी दिवास्वप्न ठरलेले असताना अवैध वाळू वाल्यांची चांदी होत असून त्यांनी अव्वाच्या सव्वा दराने वाळूउचल सुरूच ठेवली असताना मात्र घरकुल योजनांना मात्र वाळू मिळेनासी झाली असल्याचे दुर्दैवी चित्र कोपरगाव तालुक्यात पाहायला मिळत आहे.

 

राज्याचे वाळू धोरण फसले व सामान्य गोरगरीब माणसाला वाळू मिळणे मुश्किल झाले आहे,या वाळू धोरणामुळे नवे गुंड तयार झाले,अशा शब्दात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आ.बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागावर हल्ला चढवला होता.यातील राजकारण बाजूला ठेवले तरी वास्तव या पेक्षा वेगळे दिसत नाही.

आठ महिन्यापुर्वी ०१ मे २०२३ रोजी राज्याच्या महसूल मंत्र्यांनी ६०० रुपयांना एक ब्रास वाळूचे स्वप्न दाखवले होते त्यास आठ महिने उलटूनही गरजेइतकी वाळू तालुक्यातील नागरिकांना मिळालेली नाही.राहाता तालुक्यात कुंभारी व सुरेगावात प्रत्येकी एक वाळू डेपो तयार केल्याच्या बातम्या असताना त्यात फारसा बदल झालेला दिसत नाही.त्यामुळे इच्छुक बांधकाम व्यावसायिक व घरमालक यांना वाळू मिळेनासी झाल्याने त्यांनी आपली बंद पडलेली बांधकामे सुरु करण्यासाठी चढ्या दराने वाळू उचलण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र आहे.सरकारी कामांना तर क्रश सॅन्ड वापरण्याचे सरकारचे निर्देश असून त्या बाबत ठेकेदार मात्र चोरटी वाळू मिळते का याबाबत चाचपणी करताना दिसत आहे.मात्र त्यामुळे कामे विलंबाने करणे त्यांना महाग पडू शकते असा कयास व्यक्त होत आहे.

   नुकत्याच नागरपूर येथे संपलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान माजी महसूल मंत्री व विद्यमान आ.बाळासाहेब थोरात यांनी सरकारच्या फसलेले वाळू धोरण,तलाठी भरतीत झालेले गैरप्रकार आणि कंत्राटी पद्धतीने तहसीलदारांची भरती प्रक्रिया यावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला होता.महसूलमंत्र्यांनी वाळू तस्करांना सन्मानाने ठेके दिले असल्याचा आरोप करून त्यांच्याकडूनच आता रात्री-बेरात्री वाळूची तस्करी केली जाते.सामान्य गोरगरीब माणसाला वाळू मिळणे मुश्किल झाले आहे,या वाळू धोरणामुळे नवे गुंड तयार झाले,अशा शब्दात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागावर हल्ला चढवला होता.यातील राजकारण बाजूला ठेवले तरी वास्तव या पेक्षा वेगळे दिसत नाही.

“कोपरगाव तालुक्यातील गरजू घरकुल लाभार्थी मात्र वाळू पासून वंचित राहताना दिसत आहे.त्यांनी पंचायत समितीत मागणी केल्यास त्यांना हेलपाटे मारण्यास भाग पाडले जात आहे.व सर्वांनी एका वेळी मागणी नोंदवावी म्हणून त्यांची बोळवण केली जात आहे.मध्यन्तरी अवैध वाळू चोरांनी माजी सरपंच यांचे भावास मारहाण करून दहशत निर्माण केली आहे.त्यामुळे आता कोणी या विरोधात बोलयला तयार असल्याचे दिसत नाही”- मोतीराम निकम,स्थानिक कार्यकर्ते,सुरेगाव.

    पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकार आग्रही असले तरी यासाठी लागणारी वाळू उपलब्ध करून देण्यात शासन सपशेल अपयशी ठरले आहे.७ वर्षात ३ वाळू उपसा धोरणे येऊनही त्यांच्या अंमलबजावणीतील त्रुटीमुळे १० वर्षात ३ ते ५ हजार रुपये ब्रास दराने मिळणारी वाळू ०७ ते १० हजारावर पोहचली आहे.याचा फटका सर्वसामान्यांना बसत असून बांधकामे महागली आहेत.शासनाने ठरवले तर जुन्या दरातच वाळू उपलब्ध होऊ शकते.

दरम्यान याबाबत सुरेगाव येथील वाळू डेपो दि.२२ जुलै २०२३ पासून सुरु झालेला असून वर्तमानात रात्री तेथील कॅमेरे बंद करून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सरकारी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरु आहे.सदर वाळू ओली असल्याने नजीकचे रस्ते दलदलमय झाले आहे.त्यावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.वाळूतस्कर बोगस आधार कार्डचा वापर करून सदर वाळू उपसा करताना दिसत आहे.कोपरगाव तालुक्यातील गरजू घरकुल लाभार्थी मात्र वाळू पासून वंचित राहताना दिसत आहे.त्यांनी पंचायत समितीत मागणी केल्यास त्यांना हेलपाटे मारण्यास भाग पाडले जात आहे.व सर्वांनी एका वेळी मागणी नोंदवावी म्हणून त्यांची बोळवण केली जात आहे.मध्यन्तरी अवैध वाळू चोरांनी माजी सरपंच यांचे भावास मारहाण करून दहशत निर्माण केली असल्याचे वृत्त आहे.त्यामुळे आता कोणी या विरोधात बोलयला तयार असल्याचे दिसत नाही.

   या नागरिकांच्या वाळू टंचाई बाबत आमच्या प्रतिनिधीने शिर्डी येतील महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”वर्तमानात राहाता तालुक्यात तीन वाळू डेपो सुरु असून कोपरगाव तालुक्यात कुंभारी व सुरेगाव या ठिकाणी वाळू डेपो असल्याची माहिती दिली असून उर्वरित ठिकाणी आणखी वाळू डेपो सुरु करण्यात येणार आहे त्याच्या निविदा वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या असून हे डेपो पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर नागरिकांची वाळू टंचाई दूर होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.त्यामुळे हे वाळू डेपो कधी सुरु होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close