जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

…’ते’ अतिक्रमण हटवले नाही तर पुन्हा एकदा आंदोलन करणार-घोषणा 

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरातील सरकारी ५०.३३ एकरवरील जागेवरील प्रस्थापित राजकीय नेत्यांनी केलेल्या अतिक्रमण विरोधात सेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव यांनी छेडलेल्या,’आमरण उपोषणा’च्या पाचव्या दिवशी महसूल व नगरपरिषद अधिकारी यांनी पंधरा दिवसात बेकायदा सुरु असलेले काम काढून घेण्याच्या अटीवर सोडून दिले आहे.त्यामुळे आगामी काळात खरेच प्रशासन हि कारवाई करेल का असा सवाल नागरिकांच्या निर्माण झाला आहे.

  

“सदर ५०.३३ एकर जागेचा ताबा घेण्यासह केलेले विद्यमान लोकप्रतिनिधी आ.काळे व माजी आ.कोल्हे यांनी अनधिकृत बांधकाम हटवले नाही तर आपण पुन्हा एकदा आपले आंदोलन सुरु करणार आहे”-बाळासाहेब जाधव,माजी उपजिल्हा प्रमुख शिवसेना.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहराच्या हद्दीत साईबाबा चौक परिसरात सिटी सर्व्हे क्रं.१९३५ हा असून हा सर्व्हे क्रं.सरकारी मालकीचा आहे.याचे एकूण क्षेत्र ५० एकर ३३ आर इतके आहे.हि कोट्यवधींची मालमत्ता दि.०१ एप्रिल १९५६ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी तथा चेअरमन जिल्हा विकास मंडळ यांनी तत्कालीन तालुका विकास मंडळ कोपरगाव यांना कृषी प्रदर्शनासाठी दरसाल ०२ हजार ६०१ रुपये इतक्या खंडाने दिली होती.त्याचा २० वर्षांचा करार होऊन तो त्याच दिवशी ताब्यात दिला होता.त्याची मुदत दि.०१ एप्रिल १९७६ रोजी संपली होती.दरम्यान ती कधीही वाढून दिलेली नाही मात्र सदर मोठे क्षेत्र तालुक्यातील बड्या नेत्यांनी आपापसात वाटून घेतले हे वस्तुस्थिती असताना त्यासाठी शिवसेनेचे माजी जिल्हा उप प्रमुख बाळासाहेब जाधव यांनी त्या विरोधात उच्च न्यायालयात दंड थोपटले होते.त्यातून न्यायालयाने सदर क्षेत्र सरकार जमा करून घेतले होते मात्र त्याचा ताबा घेण्यास मात्र टाळाटाळ सुरु ठेवली होती.विशेष म्हणजे त्या क्षेत्रावर बेकायदा ‘कॉल सेंटर’ उभारणीचे जोरदार काम सुरु केले होते.त्या विरोधात बाळासाहेब जाधव यांनी दि.०४ डिसेंबर २०२३ पासून,’आमरण उपोषणाचे’ आंदोलन छेडले होते.त्यावर प्रशासनास जाग आली असून चौथ्या दिवशी चचेंत सहभाग घेतला होता.मात्र जाधव हे आपल्या अतिक्रमण तात्काळ काढण्याच्या अटीवर अडून बसले होते.त्यामुळे संतापून प्रशासनाने त्यांचे फ्लेक्स रात्रीच्या सुमारास पोलीस बळ वापरून काढून घेतले होते.त्यामुळे कोपरगाव शहर आणि तालुक्यात मोठा संताप पसरला होता.मात्र त्यांनी पाचव्या दिवशी जाधव यांनी प्रकृती खालावल्यावर तडजोडीचा मार्ग स्वीकारला असून पंधरा दिवसात अतिक्रमण काढून घेण्याच्या लेखी अश्वासनावर आपले आंदोलन उपस्थितांचे हस्ते लिंबू पाणी घेऊन मागे घेतले आहे.त्यामुळे नगरपरिषद आणि महसूल विभाग सदर अतिक्रमण काढणार की चालढकल करणार हे लवकरच कळणार आहे.

   दरम्यान आमच्या प्रतिनिधीने या बाबत आंदोलनकर्ते बाळासाहेब जाधव यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”सदर जागेचा ताबा घेण्यासह केलेले विद्यमान लोकप्रतिनिधी आ.आशुतोष काळे व माजी आ.कोल्हे यांनी अनधिकृत बांधकाम हटवले नाही तर आपण पुन्हा एकदा आपले आंदोलन सुरु करणार असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे सत्ताधारी वर्गात चिंता पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close