आंदोलन
पाझर तलाव भरण्यासाठी महामार्ग रोखला,प्रशासनाची तारांबळ !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अ.नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातील पाणी कोपरगाव व सिन्नर तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांना मिळावे या मागणीसाठी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले असून जलसंपदा विभागाला जाग आणली असून त्याबाबत चार दिवसात निर्णय घेण्यात भाग पाडले असल्याची माहिती हाती आली आहे.

निळवंडे डाव्या कालव्याच्या दुसऱ्या आवर्तनात किमान बहादरपूर,जवळके,धोंडेवाडी,शहापूर,बहादराबाद,शहापूर,सायाळे,वारेगाव आदी पाझर तलावात तर पुंच्छ भागातील वाकडी,चितळी,धनगरवाडी,दिघी आदी तलावात निळवंडेचे चाचणीचे पाणी जलसंपदा विभागाने सोडलेले नाही.बहादरपूर येथील शेतकऱ्यांनी सुमारे १३ लाख रुपये खर्चून चारी खोदली असून त्यात अद्याप एक पाण्याचा थेंब गेलेला नाहीत्यामुळे शेतकऱ्यांत मोठा संताप आहे त्यातून समृद्धी महामार्गावर,’रास्ता रोको’ आंदोलन घडून आले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”निळवंडे कालवा कृती समितीचे पत्रकार नानासाहेब जवरे व विक्रांत काले यांनीं उच्च न्यायालयाच्या छ.संभाजीनगर खंडपीठात अड्.अजित काळे यांच्या सहकार्याने जनहित याचिका (क्रं.१३३/२०१६) दाखल करून हा प्रश्न मार्गी लावला आहे.डाव्या कालव्यांची दुसरी चाचणी गत दोन महिन्यापासून सुरु आहे.त्यातच वर्तमानात मोठा दुष्काळ आहे.शेतकऱ्यांना रब्बी पिकांना व पिण्यास पाणी शिल्लक नाही.चारा पिकांना पाणी उपलब्ध नाही.त्यामुळे आत्ताच माय लेकराला धरेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.दुसऱ्या आवर्तनात किमान बहादरपूर,जवळके,धोंडेवाडी,शहापूर,बहादराबाद,शहापूर,सायाळे पाझर तलावाच्या खालील भाग आदीसह पुंच्छ भागातील वाकडी,चितळी,धनगरवाडी,दिघी आदी तलावात निळवंडेचे चाचणीचे पाणी सोडलेले नाही.बहादरपूर येथील शेतकऱ्यांनी सुमारे १३ लाख रुपये खर्चून चारी खोदली असून त्यात अद्याप एक पाण्याचा थेंब गेलेला नाही.या शिवाय अद्याप या लढ्यात निळवंडे कालवा कृती समितीच्या माध्यमातून योगदान देणारी गावे व कार्यकर्ते,शेतकरी पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिले आहे.त्यामुळे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची वेळीच दखल घेऊन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निळवंडे डावा कालवा संपूर्ण लाभक्षेत्रातील किमान पाझर तलाव व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून पिण्याच्या पाण्यासाठी व चारा पिकांना वंचित गावांना तातडीने पाणी उपलब्ध करणे व सर्व बंधारे भरे पर्यंत आवर्तन बंद करू नये या परिसरातील वेस-सोयगाव,अंजनापूर,बहादरपूर,जवळके,धोंडेवाडी,शहापूर,बहादराबाद,पुंच्छ भागातील वाकडी,धनगरवाडी आदी पाझर तलावात व के.टी.वेअर मध्ये निळवंडेचे चाचणीचे पाणी सोडणे गरजेचे आहे.मात्र धोंडेवाडी,जवळके,बहादराबाद,शहापूर आदी ठिकाणी निळवंडेचे चाचणीचे पाणी पोहचले नाही.सदर गावांनी जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकारी,शिर्डी येथील अपर जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी कार्यालय,कोपरगाव येथील तहसील व गटविकास अधिकारी कार्यालय आदींना पत्रव्यवहार करून व त्यांनी लेखी उत्तर देऊनही अद्याप पाणी मिळालेले नाही.त्या मुळे या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांत मोठा असंतोष आहे.त्याची खदखद नुकतीच समृद्धी महामार्गावर सायाळे हद्दीत नुकतीच,’रास्ता रोको आंदोलना’च्या माध्यमातून बाहेर पडली आहे.

कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर,अंजनापूर,तर सिन्नर तालुक्यातील देवकौठे,मलढोण,सायाळे,दुसंगवाडी,पाथरे खुर्द पाथरे बुद्रुक व वारेगाव येथील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.जलसंपदा विभागाने सिन्नर तालुक्यातील गावांसाठी नदी मार्गाने पाणी सोडले होते.मात्र हे आवर्तन पाथरे वारेगाव पर्यंत देण्याची शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे.सायाळे येथील पाझर तलावातून ते बहादरपूर,शहापूर येथील पाझर तलावात सोडावे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

निळवंडे च्या पाण्यामुळे किमान पूर्व भागातील जनावरांचा व काही अंशी शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल यामुळे शेतकरी आवर्तनासाठी आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर सायाळे शिवारात शेकडोच्या संख्येने एकत्र येत शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गावरची वाहतूक रोखून धरली होती.
या आंदोलनात निळवंडे कालवा कृती समितीचे सुमारे ३००-३६० शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.सकाळी सव्वा अकरा ते सव्वा बारा दरम्यान,’रास्ता रोको आंदोलन’ करण्यात आले होते. नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून वावी पोलिसांच्या मदतीला सिन्नर आणि एम.आय.डी.सी.पोलीस ठाण्यातील पोलीस पथक घटनास्थळी धाडण्यात आले होते. तसेच दंगा नियंत्रण पथकाची विशेष तुकडी देखील आंदोलन स्थळी दाखल झाली होती.
या आंदोलनाची नाशिकचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना माहिती देण्यात आली.निळवंडे प्रकल्पाचे व जलसंपदा विभागाचे अधिकारी आंदोलन स्थळी आल्यावर झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग सोडला.सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे वकील व शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे,कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,भागवतराव आरोटे,सायाळे येथील सरपंच शेंडगे,डॉ.विजय शिंदे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.तर उपस्थितांत बहादरपूर सरपंच गोपीनाथ रहाणे,सुधाकर शिंदे,तानाजी शिंदे,ज्ञानदेव शिंदे,दगडू रहाणे आदिसंह बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.
वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना व शेतकऱ्यांना समन्वयातून मार्ग काढावा,महामार्गावरची वाहतूक रोखून धरू नये असे आवाहन केले मात्र त्याला शेतकऱ्यांनी दाद दिली नाही शेवटी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी आवाहन केल्यावर सदर आंदोलन मागे घेण्यात आले होते.त्यावेळी लांबच लांब वाहनाच्या रांगा लागल्या असल्याचे पाहायला मिळाले आहे.