निवड
उपसरपंचपदाच्या निवडणुकीत…या गटाची आघाडी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव पंचायत समितीच्या नुकत्याच संपन्न झालेल्या १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदावर आघाडी घेतल्यानंतर आ.आशुतोष काळे गटाने उपसरपंच पदाच्या निवडणुकीत बाजी मारली असल्याचे दिसून आले असून त्यात कान्हेगाव,मंजुर,कारवाडी,शहाजापूर,दहेगाव बोलका,चांदगव्हाण,लौकी या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोपरगाव मतदार संघातील पार पडलेल्या १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काळे गटाने आपली विजयी परंपरा कायम ठेवत पुन्हा एकदा माजी आ.कोल्हे गटास
कान्हेगाव,मंजुर,कारवाडी,शहाजापूर,दहेगाव बोलका,चांदगव्हाण,लौकी या पंचायतीत धोबीपछाड दिली असल्याचे दिसून आले आहे.
कोपरगावचे आ.काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव मतदार संघातील पार पडलेल्या १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काळे गटाने आपली विजयी परंपरा कायम ठेवत पुन्हा एकदा माजी आ.कोल्हे गटास धोबीपछाड दिली असल्याचे दिसून आले आहे.या ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्यातील उपसरपंचांच्या निवडी मध्ये अनेक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून दुसऱ्या टप्प्यात देखील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाच्या असणाऱ्या कान्हेगाव,मंजुर,कारवाडी,शहाजापूर,दहेगाव बोलका,चांदगव्हाण,लौकी या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे उमेदवार विराजमान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील उपसरपंचपदाच्या निवडणुकीतील काळे गटाचे उमेदवार पुढीलप्रमाणे ग्रामपंचायत कान्हेगाव -दिपक प्रकाश चौधरी,कारवाडी- सचिन वसंतराव शिरसागर यांची तर मंजुर-ग्रामपंचायत पंडित देवराम गावंड, शहाजापूर-शरद साहेबराव वाबळे,दहेगाव बोलका-गुलाबराव प्रभाकर वल्टे,चांदगव्हाण-दिलीप कारभारी आव्हाड, लौकी-राहुल दिनकर खंडीझोड हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.या सर्व नवनिर्वाचित उपसरपंचांचे माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.