व्यक्ती विशेष
तरुणांनी संस्कृती जोपासण्याची गरज-…या महाराजांचे प्रतिपादन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमानात तरुण पिढीने पाचच्यातय संस्कृती स्विकारताना भारतीय संस्कृतीचे जतन करणे आवश्यक आहे,भारतीय संस्कृती,परंपरा महान असुन संत ज्ञानेश्वर महाराजांनी सातशे वर्षांपूर्वीच आजच्या शोधाबददल भाकीत केले होते, चित्रपट शंभर वर्षांपूर्वी तयार झाला परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी सातशे वर्षांपूर्वीच वर्णन केले असून तरुणांनी नक्कीच ज्ञानेश्वरी अभ्यासली पाहिजे.ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा माणसाच्या जीवनाचा प्रेरणादायी आहे,ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अभ्यासुन चिंतन केले तर आयुष्य सुखी समाधानी होते असे प्रतिपादन समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
संगमनेर तालुक्यातील देवगाव येथील कै.ह.भ.प.महादु देवराम पाटील भवर (माऊली) यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त किर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कोपरगाव येथील साहित्यीक छायाचित्रकार हेमचंद्र भवर,सुदर्शन वृत्तवाहिनीचे राजेंद्र भवर,पंचक्रोशीतील मान्यवर,संस्थांचे पदाधिकारी,नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आज समाजात विकार आजार वाढत आहेत,माणूस मानसिक ताण तणावाच्या ओझ्याने दबला आहे,आजचा माणूस हसणं विसरून गेला आहे;त्यामुळे आजारपण वाढले आहेत.
पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या समारंभास पंचक्रोशीतील मान्यवर,संस्थांचे पदाधिकारी,नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले तर आण्णासाहेब महादु भवर यांनी स्वागत प्रास्ताविक केले आहे तर उपस्थितांचे राजु भवर यांनी आभार मानले आहे.