आंदोलन
दुष्काळी भागातील पाझर तलाव भरा,अन्यथा मोठे जन आंदोलन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
निळवंडे डाव्या कालव्याची दुसरी चाचणी बंद करण्याआधी लाभक्षेत्रातील सर्व पाझर तलाव,के.टी.वेअर प्रस्तावित चाऱ्यांच्या माध्यमातून भरून देऊन दुष्काळी पट्टयातील शेतकऱ्यांचे पशुधन वाचवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जलसंपदा विभागाने प्राधान्याने करावी अशी महत्वपूर्ण मागणी निळवंडे कालवा कृती समितीच्या संगमनेर येथील एका आंदोलनात भागवतराव आरोटे यांनी नुकतीच बोलताना केली आहे.
निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीने आज जलसंपदा विभागाच्या संगमनेर घुलेवाडी येथील ऊर्ध्व प्रवरा प्रकल्प-२ कालवा विभागाच्या कार्यालयासमोर आज
निळवंडे उजवा कालवा तातडीने पूर्ण करणेसह डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील पाझर तलाव त्वरित पूर्ण क्षमतेने भरणेसाठी तातडीने प्रस्तावित वितरण व्यवस्था पूर्ण करण्या साठी आज सकाळ पासून धरणे आंदोलन करण्यात आले त्यावेळी त बोलत होते.
सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,मच्छिंद्र दिघे,माजी उपाध्यक्ष रमेश दिघे,संघटक नानासाहेब गाढवे,सचिव कैलास गव्हाणे,उत्तमराव जोंधळे,तानाजी शिंदे सर,रमेश दिघे,कौसर सय्यद,रावसाहेब मासाळ,सुधाकर शिंदे,अशोक गव्हाणे,सखाहारी थोरात सर,डॉ.विजय शिंदे,पंडित चासकर,नानासाहेब गाढवे,उत्तमराव जोंधळे,दगडू रहाणे,सुधाकर रहाणे,शशिकांत साबदे,नवनाथ शिंदे,भिवराज शिंदे,दिनकर चासकर,दत्तात्रय थोरात,नवनाथ शिंदे,नारायण शिंदे,अजित मुंगसे,परबत गव्हाणे,बाळासाहेब गव्हाणे,रामदास गव्हाणे,सुभाष शिंदे,अनिल गाजरे,अभिमन्यू मुंगसे,सोन्याबापू उर्हे सर,ज्ञानदेव पाटील हारदे,
अण्णासाहेब शेटे,बापूसाहेब कोंबरणे,सुभाष नेहे,बाळासाहेब सोनवणे,अमोल साबदे,अतुल मोमलेआदी प्रमुख कार्यकर्त्यांसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही,डोंगळे लावून नको त्या ठिकाणी पाणी नेले आहे.पाणी आमच्या माथी टाकले आहे.ही नेत्यांना आणि जलसंपदा विभागासाठी लाजिरवाणी बाब आहे.डाव्या कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकरी ऐन दुष्काळात पिण्याच्या आणि शेती पाण्यापासून अद्याप वंचीत आहेत.आणि नेते आगामी निवडणुका पाहून आपल्या मत पेट्या कशा भरवायच्या याचा गत ५३ वर्षांपासून विचार करून शेतकऱ्यांना फसवत आहे.आता या अनिष्ठ प्रथा त्यांनी बंद कराव्या अन्यथा त्यास दुष्काळी जनता उत्तर दिल्याशिवाय रहाणार नाही असा इशारा दिला आहे.
सदर प्रसंगी कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे यांनी अर्धवट उजव्या कालव्याचे काम भूसंपदनासह तातडीने पूर्ण करावे अशी मागणी करून दुष्काळी शेतकऱ्यांना उत्तर नगर जिल्ह्यातील सहकार नेत्यांनी केवळ मतपेटीचे साधन बनवण्याच्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.व निळवंडे डाव्या कालव्याच्या दुसऱ्या चाचणीत पाणी शेतकऱ्यांना कमी आणि भंडारऱ्याच्या लाभक्षेत्रात जलजीवन मिशनच्या पाईपणे जास्त चोरले जात असून अधिकारी त्याकडे डोळेझाक करत असल्याचा निषेध व्यक्त केला आहे.अर्धवट प्रकल्पाचेदेशाचे पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या हस्ते उदघाटन करून पालक मंत्री विखे यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली असल्याचा आरोप केला आहे.आगामी पंधरा दिवसात प्रस्तावित नकाशाप्रमाणे चाऱ्यातून उत्खनन करून उर्वरित पाझर तलाव भरून देण्याची मागणी केली आहे.जलसंपदा विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्यास आगामी पंधरा दिवसांनी मोठे जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा जलसंपदा विभागाला दिला आहे.
सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले यांनी समितीचे याचिकाकर्ते पत्रकार नानासाहेब जवरे,विक्रांत काले यांच्या उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेचा उल्लेख करून त्यास वकील संघाचे अध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या योगदानाबद्दल कौतुक करून त्यांच्या साहाय्याने हा लढा यशस्वी झाल्याचे नमूद केले आहे.व निळवंडे धरणाच्या पाण्यावरील दरोडा परतून लावला असल्याचे सांगून राजकीय नेत्यांनी केवळ निवडणुका जिंकण्यासाठी या मुद्द्याचा वापर केल्याचा आरोप केला आहे.शेवटी डाव्या कालव्याचे काम अजून अर्धवट असल्याची माहिती देऊन अर्धवट कामाचे लोकार्पण कसे होऊ शकते असा प्रश्न उपस्थित केला आहे.
डॉ.विजय शिंदे यांनी आम्हाला पाणी नाही तर कोणालाही देऊ देणार नाही.अधिकाऱ्यांना झोपू देणार असा इशारा दिला आहे.
सदर प्रसंगी सोन्याबापू उर्हे यांनी उजव्या कालव्याचे काम तातडीने पूर्ण करावे,वन विभागाची परवानगी मिळवली मात्र अद्याप ७० मीटरचे काम व पूर्ववत सुरू झाले नाही,
एका अवर्तनात एक टी.एम.सी.पाणी सोडणे आवश्यक नाही तर जास्त पाणी सोडून किमान लाभक्षेत्रात पन्नास टक्के पाणी पाझर तलाव भरून देणे गरजेचे आहे.कालवे अपूर्ण आहे.कामे अपूर्ण आहे.
सदर प्रसंगीं भ्रमणध्वनीवर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे यांच्या साक्षीने कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे यांनी दुष्काळी भागातील सर्व बंधारे, पाझर तलाव आगामी पंधरा दिवसात भरून दिले जातील असे आश्वासन दिले असून त्याचे लेखी देण्याचे आश्वासन दिल्या नंतर धरणे आंदोलन संपुष्टात आले आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक गंगाधर रहाणे यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन तानाजी शिंदे सर,कैलास रहाणे,सोन्याबापू उऱ्हे सर,नानासाहेब गाढवे,माजी अभियंता सीताराम रहाणे,उत्तमराव जोंधळे यांनी मार्गदर्शन केले आहे.उपस्थितांचे आभार कौसर सय्यद यांनी मानले आहे.