निवडणूक
ग्रामपंचायत निवडणूक,कोपरगाव तालुक्यात आ.काळे गटाचा वरचष्मा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात एकूण २३५९ ग्रामपंचायती असून आज जाहीर झालेल्या निकालात महायुतीने २०० हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे.तर कोपरगाव तालुक्यात आ.आशुतोष काळे गटाने सतरा पैकी बारा तर कोल्हे गटांस तीन तर कुंभारी येथील एक अपक्ष,तर जवळके येथील ग्रामपंचायतीत स्थानिक परिवर्तन ग्रामविकास पॅनलला आठ जागांपैकी सहा जागा मिळविण्यात यश मिळाले आहे.तेथे सरपंच पदी सारिका विजय थोरात या मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालांमध्ये भाजपा,अजित पवार गट आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यात चुरस पाहण्यास मिळाली आहे.महायुतीने २०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.अजित पवार गटाने ८१ तर भाजपाने ८८ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे.राज्यात एकूण २३५९ ग्रामपंचायती आहे.महायुतीने २०० हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे.

दरम्यान कोपरगाव तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहे.त्या १७ ग्रामपंचायतीचे निवडणूक निकाल पुढील प्रमाणे-
१) शहाजापूर-काळे गट-२,कोल्हे गट ७,सरपंच ( काळे ),
२) बोलकी -काळे गट १,कोल्हे गट-६,सरपंच ( कोल्हे) ३),धोञे-काळे गट ४,कोल्हे गट ७,सरपंच ( कोल्हे )
४) कान्हेगाव-काळे गट- ७,कोल्हे -१,अपक्ष-१ सरपंच (काळे)५) लौकी-काळे गट-३,कोल्हे गट ४,सरपंच (काळे)
६) दहेगाव बोलका- काळे-परजणे -७, कोल्हे गट ४,सरपंच -भारत विठ्ठल चौधरी (काळे-परजणे)
७) घोयेगाव -काळे गट -२,कोल्हे गट -१,परजणे गट -४,सरपंच – (काळे गट)

८) चांदगव्हाण-काळे गट-३,कोल्हे गट-४,सरपंच-(काळे गट),९) जवळके-परिवर्तन ग्रामविकास पॅनल व स्थानिक गट गट-५,काळे गट-१ स्थानिक गट-१,सरपंच-सारिका विजय थोरात (परिवर्तन ग्रामविकास गट),१०) ब्राम्हणगाव -काळे गट-१,कोल्हे गट- १३,सरपंच अनुराग येवले (कोल्हे )
११) कुंभारी-अपक्ष ६,सरपंच-देवयानी प्रशांत घुले (अपक्ष)
कोपरगाव तालुक्यातील विजयी उमेदवारांचे आ.आशुतोष काळे,संजीवनीचे कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे,माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे,विजय वहाडणे,शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे,अ.नगर जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नानासाहेब जवरे,माजी उपअभियंता एस.के.थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,बंडोपंत थोरात,बाबासाहेब थोरात,निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे,गंगाधर रहाणे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू उऱ्हे,सचिव कैलास गव्हाणे,संघटक नानासाहेब गाढवे,भिवराज शिंदे,जवळके ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच डी.के.थोरात,गोरक्षनाथ थोरात,नवनाथ थोरात,अलकाताई शिंदे,विजय थोरात,नवनाथ पन्हाळे,जेष्ठ कार्यकर्ते रावसाहेब सु.थोरात,माजी सदस्या सुनीता रावसाहेब थोरात,दत्तात्रय थोरात,बाळासाहेब थोरात,ज्ञानदेव थोरात,संतोष थोरात,संजय थोरात,नवनाथ शिंदे,आण्णासाहेब भोसले,ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सुनीता रा.थोरात,राजेंद्र थोरात,रामनाथ थोरात,जनमंगल ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव थोरात,श्रीहरी थोरात,वेणूनाथ थोरात,बाळासाहेब थोरात,प्रशांत थोरात,परशराम शिंदे,विजय शिंदे,गोरक्षनाथ शिंदे,संदीप थोरात,आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.विजयी उमेदवारांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
बातमी अद्यावत होत आहे….