आंदोलन
कोपरगावात मराठा समाज आंदोलनास वाढता पाठींबा

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शहरासह संवत्सर येथे सकल मराठी समाजाच्या वतीने मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून साखळी उपोषण करण्यात आले असून त्यास पेन्शनर संघटनेने आपला पाठींबा व्यक्त केला आहे.त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.

मराठा आरक्षण आंदोलनासाठी कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे साखळी उपोषण केले जात असून त्यास अनेक ग्रामस्थानीं घटनास्थळी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.त्यात पेन्शनर संघटनेने आपला पाठींबा व्यक्त केला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी स्थगित केलेले उपोषण दि.२५ ऑक्टोबर पासून आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे.मराठा समाज बांधवांनी कोणतेही उग्र आंदोलन न करता जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने साखळी उपोषण करावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.त्या आवाहनाला प्रतिसाद देत मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे साखळी उपोषण केले जात असून त्यास अनेक ग्रामस्थानीं घटनास्थळी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.त्यात पेन्शनर संघटनेने आपला पाठींबा व्यक्त केला आहे.
सदर प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष दिलीप ढेपले,संघटक रामभाऊ वालझडे,श्री शेटे सर,कार्याध्यक्ष गोपीचंद इंगळे सरचिटणीस धुमाळ आदींनी जाहीर पाठिंबा दिला आहे
सदर प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी क्षत्रिय धनगर सेवा संघ महाराष्ट्र राज्याध्यक्ष भाऊसाहेब शेळके,राज्यसचिव रमेश टिक्कल,किरण थोरात,अशोक ढेपले,मार्गदर्शक दिलीप ढेपले,चिमाजी दैनिक यादव,दहिने पन्ना नेहे,भाऊसाहेब ढेपले,धनगर सेवा संघाचे पदाधिकारी आदींनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
यावेळी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष किरण खर्डे यांनी मराठा समाजाला आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा दिला आहे. सरकारने त्यांची मागणी रस्ता असून सकारात्मक विचार करावा अशी मागणी या प्रसंगी मधुकरराव साबळे,खंडू पाटील फेपाळे,उपसरपंच विवेक परजणे,शिवाजीराव गायकवाड,ज्ञानेश्वर परजणे,महेश परजणे,चंद्रकांत लोखंडे, लक्ष्मणराव साबळे,लक्ष्मणराव परजणे आदींनी दर्शवला आहे.