धार्मिक

….येथे विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार संपन्न !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र जवळके येथे मिती अश्विन शुद्ध रविवार दि.१५ ऑक्टोबर ते मिती अश्विन शुद्ध सोमवार दि.१६ ऑक्टोबर या दोन दिवशी सुमारे १३-१४ लाख रुपये खर्चून श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा गोदावरी धाम येथील महंत रामगिरीजी महाराज यांचे शुभ हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

 

दि.१६ ऑक्टोबर या दुसऱ्या दिवशी सकाळी ०७ वाजता प्रातःपुजन,मूर्ती धान्यादी उत्तीष्ठ,मूर्ती अभिषेक,मूर्ती कलश स्थापना,उत्तरांग हवन,विशेष हवन,क्षेत्रपाल बली पूजन,पूर्णाहुती महाआरती,ब्रम्हवृंदाचे पूजन  आशीर्वाद आदी कार्यक्रम संपन्न होणार असून सकाळी ११ वाजता गोदावरी धाम श्री क्षेत्र सराला बेट येथील महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहन संपन्न होणार आहे.

   ‘विठ्ठल’ हे वारकरी संप्रदायाचे (भागवत धर्माचे) प्रमुख दैवत मानले जाते.विठोबा,विठुराया,पांडुरंग,किंवा पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्र व कर्नाटक ह्या राज्यात पूजली जाते.विठोबा,ज्याला वि (त) थल (अ) आणि ‘पांडुरंग’ म्हणूनही ओळखले जाते.त्याला सामान्यतः देव विष्णूचे किंवा तथा अवतार,कृष्णाचे रूप मानले जाते.कटेवर हात ठेवून विठोबा उभा राहतो,कधीकधी त्याची पत्नी रखुमाई सोबत असते.विठोबा हा महाराष्ट्रातील मराठा,वैष्णव, हिंदू ,वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे प्रमुख आराध्य दैवत आहे.

‘विठोबा’ या देवतेचा उगम आणि विकास ही विशेषतः वैष्णव संप्रदायातील महत्वाची संकल्पना म्हणून ओळखली जाते.विठोबा हा कृष्णाचा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहे असे मानले जाते.तो श्री क्षेत्र जवळके येथे अवतरीत होत आहे हि अत्यानंदाची बाब आहे.

संत तुकोबारायांनी विठोबा शब्दाची उत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोप्या भाषेत केली आहे.तो असा की,’वि’ म्हणजे,’ज्ञान’, ‘ठोबा’ म्हणजे,’आकार’ -ज्ञानाचा आकार किंवा ज्ञांनाची मूर्ती म्हणजे ‘विठोबा’ किंवा वि म्हणजे गरूड आणि ठोबा म्हणजे आसन अर्थात गरूड ज्याचे आसन आहे तो विष्णू तोच कटीवर कर ठेवूनि विटेवरी उभा आहे.श्रीकृष्ण,श्रीविष्णू आणि श्रीविठोबा हे एकच मानले जातात.त्या विठ्ठलास पंढरपुरास ज्यांना जाता येत नाही त्यांची गावीच सोय करण्यासाठी गावोगावी विठ्ठल-रुक्मिणीची मंदिरे उभी राहिली असल्याचे आपल्याला दिसून येते.असेच मंदिर वर्तमानात जवळके येथील निवडक ग्रामस्थानीं उभे केले असून त्यासाठी १३-१४ लाख रुपयांचा ऐच्छिक आर्थिक निधी गोळा करून त्यात एक सुंदर मूर्ती पंढरपुरातून नुकतीच वाजतगाजत मिरवणूक काढून आणली आहे.त्याची प्राण प्रतिष्ठा दि.१५ ऑक्टोबर रोजी संपन्न होत आहे.

  सदर मूर्तीची प्रथम दिवशी गावातून वाजतगाजत मिरवणूक संपन्न होणार आहे.त्यानंतर मंडप प्रवेश होणार आहे.त्या नंतर पुण्याह वाचन,मातृकापूजन,नंदी श्राद्ध,मूर्ती जलाधिवास पूजन आदी पूजन कार्यक्रम होणार आहे.त्यानंतर स्थापित मूर्ती पूजन,मूर्ती जलाधी उत्तीष्ठ,प्रधान मूर्ती अभिषेक पूजन,हवन,स्तपन विधी,मूर्ती धान्यादिवास,सायंपूजा,आरती मंत्र पुष्पांजली,तर सायंकाळी ०७ वाजता भागवताचार्य ह.भ.प.वैजिनाथ महाराज जगदाळे,पंढरपूर यांचे जाहीर हरी कीर्तन व त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद वितरण होणार आहे.

महंत रामगिरीजी महाराज श्री क्षेत्र सराला बेट.

दि.१६ ऑक्टोबर या दुसऱ्या दिवशी सकाळी ०७ वाजता प्रातःपुजन,मूर्ती धान्यादी उत्तीष्ठ,मूर्ती अभिषेक,मूर्ती कलश स्थापना,उत्तरांग हवन,विशेष हवन,क्षेत्रपाल बली पूजन,पूर्णाहुती महाआरती,ब्रम्हवृंदाचे पूजन  आशीर्वाद आदी कार्यक्रम संपन्न होणार आहे.तर सकाळी ११ वाजता गोदावरी धाम श्री क्षेत्र सराला बेट येथील महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहन संपन्न होणार आहे.त्या नंतर त्यांचे हरिकीर्तन संपन्न होणार असून शेवटी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

   या श्री क्षेत्र जवळके येथे संपन्न होणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा उत्सवास जवळके आणि परिसरातील भाविक महिला,ग्रामस्थानीं मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जवळके भजनी मंडळाच्या वतीने शेवटी केले आहे.





Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close