सण-उत्सव
नवरात्र महोत्सव तयारी अंतिम टप्प्यात…
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोपरगावसह या वर्षी शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून कोपरगाव शहरातील निवारा उपनगरात साई निवारा मित्र मंडळाच्या वतीने सप्तशृंगी माता मंदिर परिसरात ती अंतिम चरणात आली सल्याची माहिती येथील आयोजक माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी दिली आहे.
शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे.नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नऊ रात्री (आणि दहा दिवस) साजरा होतो; प्रथम चैत्र महिन्यात आणि पुन्हा शारदा महिन्यात साजरा होतो.भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजा-कृत्य घडते.दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथांतून दिसून येते.दुर्गा देवतेचे माहात्म्य भविष्य पुराणात कथन केलेले आढळते.आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून,नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव.हा कोपरगाव बेट यासह शहरात दर वर्षी मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो यावर्षीही याचे आयोजन निवारा परिसरात केले असून त्यासाठी जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती आयोजक जनार्दन कदम यांनी दिली आहे.
दरम्यान या निमित्त घटस्थापना रविवार दि.१५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे व त्यांच्या धर्मपत्नी व ठोळे उद्योग समूहाचे संचालक राजेश ठोळे व त्यांच्या धर्मपत्नी यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे.
सोमवार दि.१६ ऑक्टोबर रोजी दुपारी ०३ वाजता रांगोळी स्पर्धा संपन्न होत आहे.त्यासाठी विजयी स्पर्धकासाठी पैठणी वितरण करण्यात येणार आहे.सायंकाळची ७.३० वाजता आरती कोपरगाव नगरपरिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी शांताराम गोसावी,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,तुलसीदास खुबाणी यांच्या हस्ते संपन्न होत आहे.तर रात्री ०८ वाजता माहिलासाठी उखाणे स्पर्धा,लहान मुलांसाठी विविध गुण दर्शन,फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न होणार आहे.
मंगळवार दि.१७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता लायन्स क्लबच्या वतीने मोफत कर्करोग निदान शिबीर संपन्न होत आहे.तर सायंकाळची ७.३० वाजेची आरती संजीवनीचे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,पराग संधान,दिपक विसपुते आदींच्या हस्ते संपन्न होत आहे.रात्री ०८ वाजता विविध डान्स स्पर्धा संपन्न होत आहे.त्यात समाज प्रबोधन गीतांना प्राधान्य असल्याची माहिती दिली आहे.
बुधवार दि.१८ ऑक्टोबर रोजी श्री साई निवारा मित्र मंडळाचा वर्धापन दिन असून सायंकाळी ०६ वाजता कलासाध्य इंटरटेनमेंट निर्मित संदीप जाधव यांचा,’खेळ मनाच्या पैठणीचा’ हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.तर रात्री ८.३० वाजता राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे व माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे या उभयतांच्या हस्ते आरती संपन्न होणार आहे.त्या दिवशी रात्री ८.४५ वाजता उपस्थितांना महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
गुरुवार दि.१९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता विशाल सरोदे,तुषार जमधडे राहुल भारती,वैभव गिरमे तर शुक्रवार दि.२० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता आर्किटेक्ट रविकिरण डाके,शेखर भडकवाडे,जेठाभाई पटेल,मे.साखरे स्टीलचे संचालक प्रदीप साखरे,शनिवार दि.२१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी अनिल डहाळे,विश्वनाथ गुरसळ,उमेश गोसावी,नितीन कुलकर्णी,तर रविवार दि.२२ ऑक्टोबर रोजी ज्ञानोबा राठोड,वैभव केशरवाणी,अमर नरोडे,नितीन जाधव,सोमवार दि.२३ ऑक्टोबर रोजी डॉ.अमरीश मेमाणे,गौरव भावसार,साईश भडांगे,निंबाशेठ शिरोडे,दि.२४ ऑक्टोबर रोजी अनिल जगताप,नानासाहेब गव्हाळे,माधवराव पोटे,संतोष आढाव आदींच्या हस्ते विजया दशमीच्या दिवशी आरती संपन्न होणार असल्याची माहिती जनार्दन कदम व नंदिनी कदम यांनी दिली आहे.या शारदीय उत्सवास भाविक महिला,नागरिकांनीं मोठ्या संख्येने उपस्थिती रहावे असे आवाहन शेवटी केले आहे.