क्रीडा विभाग
राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी…या संघ राजधानीत रवाना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलच्या सब-ज्युनिअर हॉकी संघाने जिल्हास्तरीय,विभागीय व राज्यस्तरीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धांमध्ये केलेल्या लक्षवेधी कामगिरीच्या जोरावर दि.१२ ते २२ ऑक्टोबर दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्यासाठी दिल्लीकडे कूच केल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दरम्यान या हॉकी खेळाडूंच्या मेहनतीसाठी विद्यालयाचे प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे,क्रीडा संचालक सुधाकर निलक,क्रीडा प्रशिक्षक,सर्व हाउस मास्टर्स आदींनी मेहेनत घेतली आहे.यांचेसह खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गौतम पब्लिक स्कूलने क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.गौतमच्या विजयी सब-ज्युनिअर हॉकी संघाने दिनांक २५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यान पुणे बालेवाडी येथील शिव छत्रपती स्टेडियम येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय नेहरू हॉकी स्पर्धेत महाराष्ट्रातील कोल्हापूर,औरंगाबाद अशा बलाढ्य संघांना पराभूत करण्याची किमया केली आहे.गौतम पब्लिक स्कूलचा क्रीडा क्षेत्रातील दबदबा कायम असून आजतागायत गौतमचा हॉकी संघ दहाव्यांदा राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करीत आहे.
दिल्ली येथील शिवाजी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे पार पडणाऱ्या राष्ट्रीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत गौतमचा विजयी संघ महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार आहे.महाराष्ट्र नेहरू हॉकी तथा गौतम पब्लिक स्कुलच्या सब-ज्युनियर हॉकी संघात मंथन देवरे (कर्णधार),शोएब शेख (उप-कर्णधार),महेश गायके (गोलकीपर),सुरज पाटील,श्रेयस तासकर,रोनक पाटील,संकेत गायकवाड,सोहम खिरीद,विपुल साळुंके,आयुष मोगल,ओम क्षीरसागर,श्लोक महागावकर,द्रोण अहिरे,समर्थ पवार व ओम मुरडणर आदी खेळाडूंचा समावेश आहे.
गौतमच्या हॉकी खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे,संस्थचे विश्वस्त आ.आशुतोष काळे,संस्थेच्या सचिव चैताली काळे,प्राचार्य नूर शेख,पालक आदींनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान गौतमच्या हॉकी संघाच्या खेळाडूंकडून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन होवून गौतम पब्लिक स्कूलचा मैदानावरचा दबदबा कायम राहावा यासाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे,क्रीडा संचालक सुधाकर निलक,क्रीडा प्रशिक्षक,सर्व हाउस मास्टर्स आदींनी मेहेनत घेतली आहे.