क्रीडा विभाग
टेबल टेनिस स्पर्धेत पुणे विभागात…या संघाचे यश

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पुणे येथील क्रीडा व युवक संचलनालय अंतर्गत व सोलापूर येथील जिल्हा क्रीडा कार्यालय व क्रीडा परिषद आयोजित विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत कोपरगाव तालुक्यातील साखरवाडी येथील सोमैया विद्यामंदिरच्या एकोणीस वर्षाखालील मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकावले आहे.त्याच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टेबल टेनिस अथवा पिंग पॉंग हा टेनिस खेळाचा एक प्रकार आहे.हा खेळ दोन खेळ अथवा चार खेळाडूंमध्ये खेळता येतो.हा खेळ टेबलावर खेळला जातो ज्याच्या मधोमध जाळी असते.ह्या खेळासाठी बॅट अथवा रॅकेट व पोकळ चेंडुची गरज असते.१९व्या शतकापासून खेळल्या जाणाऱ्या टेबल टेनिस या खेळाला राजाश्रय मिळाला होता.यात नुकतेच कोपरगाव तालुक्यातील सोमैय्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी लक्षणीय यश मिळवले आहे.

दरम्यान या संघ आता राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करणार आहे.चौदा वर्षा खालील मुलींच्या संघाने देखील उपविजेतेपद पटकाविले आहे.तसेच एकोणीस वर्षा खालील मुलांच्या संघानेही तृतीय क्रमांक पटकावला आहे.विशेष म्हणजे सर्वच खेळाडू ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांच्या घरातील आहे. त्यांनी मिळविलेले हे यश अ.नगर जिल्ह्यासाठी व पुणे विभागासाठी कौतुकस्पद आहे.या पूर्वी जानेवारी महिन्यात देखील राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत मुलींनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक पटकावला होता.
दरम्यान या संघाचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष उद्योजक समीर सोमैय्या,गोदावरी बायो रिफायनरीजचे संचालक सुहासजी गोडगेसाहेब,व्यवस्थापनातील पदाधिकारी,सोमैया स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रमुख श्री एजाज,जिल्हा क्रीडाधिकारी दिलीप दिघे,विशाल गर्जे,मिलिंद कुलकर्णी,प्राचार्या सुनीता पारे आदींनी अभिनंदन केले आहे.या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक संजय अमोलिक यांचे मार्गदर्शन लाभले होते.