सहकार
…या बँकेची डिजीटल बँकींगकडे वाटचाल-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव पिपल्स बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष कैलास ठोळे हे होते.

“कोपरगाव पीपल्स बँक व्यावसायिक स्पर्धेला सामोरे जाताना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून बँकेने सन २०२२-२३ मध्ये उल्लेखनिय प्रगती केल्याने बँकेला सहकारातील मानांकित असा “बँको ब्ल्यु रिबन अवार्ड-२०२३” हा पुरस्कार जाहीर झालेला आहे”-कैलास ठोळे,अध्यक्ष,कोपरगाव पीपल्स कॉ-ऑप बँक ली.कोपरगाव.
कोपरगाव येथील सहकारात अग्रणी असलेल्या कोपरगाव पिपल्स बँकेची वार्षिक सभा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी सदर प्रसंगी सभेस बँकेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब लोहकरे व सर्व संचालक रविंद्र लोहाडे,धरमकुमार बागरेचा,कल्पेश शहा,अतुल काले,राजेंद्र शिंगी,सत्येन मुंदडा,सुनिल बंब रविंद्र ठोळे,दिपक पांडे,सुनिल बोरा,हेमंत बोरावके,वसंतराव आव्हाड,संचालीका प्रतिभा शिलेदार,त्रिशला गंगवाल तज्ञ संचालक संजय भोकरे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक एकबोटे तसेच बँकेचे कायदा सल्लागार संजीव कुलकर्णी हे उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”बँकेची आर्थिक स्थिती भक्कम ठेवलेली असुन,बँकेला ऑडीट वर्ग ‘अ’ प्राप्त झालेला आहे.गुंतवणुक १४४ कोटी व ठेवी २७५ कोटी ठेवीशी गुंतवणुकीचे प्रमाण ५२.३६ टक्के आहे व सी.आर.ए.आर चे प्रमाण १९.८४ टक्के आहे.कर्ज वाटप १६१ कोटी असुन निव्वळ नफा २ कोटी ३७ लाख इतका झालेला आहे.नेट एन.पी.ए. १.०६ टक्के ठेवण्यात बँकेला यश मिळालेले आहे.बँकेची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.परंतु यामध्ये सतत वाढ होण्यासाठी कर्जदारांना आर्थिक शिस्त लागणे महत्वाचे आहे,कर्जदारांना नियमित परत फेडीची सवय लावणे जसे महत्वाचे आहे तसेच आर्थिक नियोजनाचे महत्व देखील पटवून देणे महत्वाचे आहे. त्यासाठी बँकेने “जोखीमयुक्त मोहीम” पध्दतीने आधारीत व्याजदर आकारणी पध्दत सुरू केल्याने,कमी व्याजदर मिळवण्यासाठी कर्जदार आर्थिक शिस्त पाळू लागल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे.
सदर प्रसंगी प्रारंभीक सभेची विषय पत्रिका उप-महाव्यवस्थापक जितेंद्र छाजेड यांनी वाचून दाखविली.विषय पत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा करून खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर करण्यात आले.विविध विषयांच्या मंजुरीच्या वेळेत झालेल्या चर्चेत सभासद केशवराव भवर,प्रदीप नवले,देवेंद्र वानखेडकर यांनी सहभाग घेतला आहे.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र छाजेड यांनी केले आहे.तर या वेळी संचालक सत्येन मुंदडा यांनी सर्व उपस्थित सभासदांचे आभार मानले आहे.