शैक्षणिक
…या ठिकाणी,’जागतिक हृदय दिन’ साजरा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग व होमिओपॅथीक महाविद्यालय येथे नुकताच ‘जागतिक हृदय दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.
हृदय आणि रक्त वाहिन्यासंबंधी रोगांचं निवारण आणि त्यांचे परिणाम याबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.हा दिवस १९७२ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा इथं स्थापन झालेल्या जागतिक हृदय महासंघा द्वारे सुरू करण्यात आला होता.तो आता जगभर साजरा केला जातो तो आज नुकताच कोपरगाव नजीक असललेल्या कोकमठाण येथे असलेल्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग व होमिओपॅथी महाविद्यालयांत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी नर्सिंग व होमिओपॅथीक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सकाळी ११ वाजता साईबाबा चौफुली ते कोपरगाव ग्रामीण रुग्णालया पर्यंत आरोग्य कशा पद्धतीने सांभाळावे व निरोगी राहण्यासाठी काय करावे.काय करू नये हा संदेश देत फेरी काढली होती.त्यात कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे विद्यार्थ्यांनी हृदय विकार का येतो व तो न येण्यासाठी काय उपाय करावे हे समजून सांगण्यासाठी एक छोटीशी नाटिका सादर केली होती.यासाठी ग्लेनमार्क फार्माब्युटीक कंपनीने आपल्या प्रायोजकत्व स्वीकारले होते.