सण-उत्सव
कोपरगावात लाडक्या गणेशाला भावपूर्ण नि…रोप !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर आणि तालुक्यातील गणेश मंडळांनी आपल्या बुद्धीच्या देवतेला व आपल्या आवडत्या गणेशाला आज दुपार पासूनच निरोप द्यायला सुरुवात केली असून रात्री अकरा पर्यंत हा उत्सव सुरू राहणार असल्याचे गर्दीवरून दिसत आहे.दरम्यान पहिल्या दिवशी चार,काल १५ तर आज दुपारी १२ वाजे आहे पासून रात्री उशिरा पर्यंत सुमारे ८६ गणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप दिला असून पुढच्या वर्षी लवकर याच्या निनादाने भावपूर्ण निरोप दिला आहे.दरम्यान कोपरगाव शहर आणि तालुका पोलिसानी या उत्सवासाठी मोठा व चोख बंदोबस्त ठेवला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी केले जाते.यामागची पौराणिक कथा अशी आहे की,ज्या दिवशी वेद व्यासजींनी महाभारत लिहिण्यासाठी गणेशजींना महाभारताची कथा कथन करण्यास सुरुवात केली,ती भाद्र शुक्ल चतुर्थी तिथी होती.कथा सांगताना वेदव्यासजींनी डोळे मिटले आणि सलग १० दिवस ते गणेशजींना कथा सांगत राहिले आणि गणेशजी लिहित राहिले.१० व्या दिवशी जेव्हा वेदव्यासजींनी डोळे उघडले,तेव्हा त्यांनी पाहिले की गणेशजींच्या शरीराचे तापमान एका ठिकाणी बसून सतत लिहित असताना लक्षणीय वाढले आहे.अशा परिस्थितीत गणपतीला शीतलता देण्यासाठी वेद व्यासजींनी थंड पाण्यात डुबकी घेतली.जिथे गणपती वेदव्यासजींच्या सांगण्यावरून महाभारत लिहित होते,तिथे जवळच अलकनंदा आणि सरस्वती नद्यांचा संगम होता.ज्या दिवशी वेद व्यासजींनी सरस्वती आणि अलकनंदाच्या संगमात स्नान केले,तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता.हेच कारण आहे की चतुर्थीला स्थापना झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला वाद्याच्या निनादात व विद्युत रोषणाईच्या साहाय्याने,फटाक्यांच्या आतषबाजीत गणपतीचे विसर्जन केले जाते.त्याचा उत्साह आज मोठ्या प्रमाणावर गणेश भक्तांत दिसून आला आहे.
दरम्यान आज सायंकाळी ०७ वाजता नरसिंह मित्र मंडळाचा पहिला गणपती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या जवळ होता.त्या नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गणपती,जय तुळजा भवानी मित्र मंडळ,हिंदूवाडा तरुण मंडळ,विजेता तरुण मंडळ,मुंबादेवी तरुण मंडळ,हिंदू राजा तरुण मंडळ,टिळक नगर युवा प्रतिष्ठान,नवश्या गणपती प्रतिष्ठान,छत्रपती संभाजी महाराज चौक मित्र मंडळ,माता वैष्णो देवी ग्रुप,क्रांती युवक संघटना,सनी ग्रुप,दत्तनगर गोरोबानगर येथील राजमुद्रा प्रतिष्ठान,निवारा येथील सेनेचे माजी शहराध्यक्ष कलविंदर दडीयाल यांच्या साई समर्थ प्रतिष्ठानचा भगवान महादेवाचा देखावा लक्षवेधी ठरला आहे.धाराशिव मित्रमंडळ,इंदिरानगर,धर्मयोद्धा प्रतिष्ठान,हिंदवी स्वराज्य मित्र मंडळ लिंबारा मैदान,हनुमाननगर मित्र मंडळ,दैत्यगुरु शुक्लेवर बेट मंडळ,एस.ए.फाउंडेशन व शेवट युवा प्रतिष्ठान मित्र मंडळाचा गणपती शेवट तहसील कार्यालयासमोर रात्री ७.४७ वाजता होता.
सदर गणेश उत्सवात,” माझ्या पपांनी गणपती आणला….” या गाण्यास चांगलीच प्रतिष्ठा प्राप्त असल्याचे दिसून आले आहे.
सदर उत्सवात गणेश क्रांती युवक मंडळाचा कृष्णवर्णीय वीर हनुमान देखावा लक्षवेधी ठरला असून अनेकांना त्याचा सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.त्यामुळे सदर देखावा नागरिकांचे आकर्षण ठरले असल्याचे दिसून आले आहे.
सदर मिरवणुकीत आ.आशुतोष काळे व त्यांचे सहकारी प्रत्येक मंडळाला भेट देताना दिसून आले आहे.तर विघ्नेश्वर चौक व्यासपीठावर माजी नगरपरिषद अध्यक्ष राजेंद्र सोनवणे,माजी उपाध्यक्ष रवींद्र पाठक,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे दिसून आले आहे.
दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० गावांसह ०२ एक गाव एक गणपती बसविण्यात आले होते.त्यात संवत्सर आणि डाऊच खुर्द आदींचा समावेश होता.तर १०५ सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या गणेश मंडळांची नोंद केली होती.तर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५५ गावांत ११ ठिकाणी एक गाव एक गणपती बसविण्यात आले होते.त्यात देर्डे चांदवड,हंदेवाडी,बक्तरपुर,मोर्विस,सांगवी भुसार,ओगदी,शिरसगाव,सावळगाव,घोयेगाव,भोजडे आदींचा समावेश होता.तर याशिवाय तर ६२ लहान गणेश मंडळांनी तर ९८ मोठे गणेश मंडळानी मोठे गणपती तर ०३ खाजगी तथा सहकारी संस्थांनी गणपती बसवले होते.दरम्यान या सर्व उत्सवावर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक वासुदेव देसले हे नियंत्रण ठेवून होते.त्याना पोलीस उपनिरीक्षक रोहोदास ठोंबरे,भरत दाते,तर तालुका हद्दीत समाधान भाटेवाल आदीसह त्यांच्या सहकाऱ्यांनी योगदान दिले आहे.