सहकार
केंद्र सरकारने साखरेचे किमान विक्री मुल्य वाढवावे-…या नेत्याची मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
केंद्र सरकारने एफ.आर.पी.मध्ये वाढ करण्याचा निर्णय स्वागतार्ह असून सरकारने साखरेच्या किमान विक्री मुल्यामध्ये वाढ केल्यास बँकेकडून प्राप्त होणारी उचल रक्कमेत वाढ होईल व सभासदांना वेळेत रक्कम अदा करण्यास मदत होणार असून एकूण परिस्थितीनुसार साखरेचे किमान विक्री मुल्य किमान रु.०३ हजार ६०० ते रु.०३ हजार ७०० करावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच एका कार्यक्रमात बोलताना केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रणी असलेला कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची आज शनिवार दि.२३ सप्टेंबर रोजी दुपारी ०२ वाजता कारखाना कार्यस्थळावर ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी आ.अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कर्मवीर काळे कारखाण्याचे माजी अध्यक्ष तथा माजी आ.अशोक काळे,उपाध्यक्ष डॉ.मच्छिंद्र बर्डे,माजी संचालक बाळासाहेब कदम,विश्वास आहेर,पद्माकांत कुदळे,चंद्रशेखर कुलकर्णी,कारभारी आगवण,काकासाहेब जावळे,बाबासाहेब कोते,नारायण मांजरे,अॅड.आर.टी.भवर,संभाजी काळे,कचरू घुमरे,सर्व संचालक मंडळ,सर्व संस्थांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक,पदाधिकारी,माजी जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सभापती, सदस्य,नगरपालिकेचे सदस्य,कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे,आसवनीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे,सचिव बाबा सय्यद,सहाय्यक सचिव संदीप शिरसाठ आदींसह कारखान्याचे सर्व विभाग प्रमुख पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”केंद्र शासनाने २०२३-२४ च्या गळीत हंगामासाठी ऊसाच्या एफ.आर.पी.मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत रु.१०० प्रतिटन वाढ करण्याच्या निर्णयाचे स्वागत करीत असून एफ.आर.पी.च्या दरात वाढ करतांना केंद्र शासनाने साखरेच्या किमान विक्री मुल्यामध्ये (एम.एस.पी.) देखील वाढ करणे गरजेचे असल्याचे सांगून
गळीत हंगाम सन २०२२-२३ मध्ये गळीतास आलेल्या ऊसास आर्थिक वर्षातील उत्पन्न व खर्चाचा विचार करता पहिला हप्ता रक्कम ०२ हजार ५०० देवून त्यानंतर ऊस दराबाबत जिल्हयात कोणीही निर्णय घेतलेला नव्हता.त्यावेळी जून २०२३ मध्ये शेतक-यांची आर्थिक गरज लक्षात घेऊन रु.२२५ प्रती मेट्रिक टन प्रमाणे देवून एकूण रु.०२ हजार ७२५प्रती मेट्रिक टन प्रमाणे देयके अदा केली आहे.कारखान्याने सन-२०११-१२ या गळीत हंगामात गळीतास आलेल्या ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पूर्वहंगामी खर्चाकामी परतीची ठेव प्र.मे.टन रु.५० प्रमाणे कपात केलेली होती.ती रक्कम व्याजासह पुढील महिन्यात त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गाळप हंगाम सन २०२३-२४ अडचणीचा आहे.चालू वर्षी भारतीय मौसमी पावसावर ‘एल निनो’चा जास्त परिणाम होवून पावसाळा संपत आला असतांना देखील समाधानकारक पाऊस झालेला नाही.साखर धंद्यामध्ये एक पावसाळा हा दोन गाळप हंगामावर परिणाम करुन जातो.चालू वर्षाचा गाळप हंगाम कमी दिवसांचा राहणार असून पुढील वर्षाकरीता ऊस लागवडी झाल्या नसल्यामुळे पुढील हंगामात कारखाने चालू होतील की नाही अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.कारखान्याचे अद्यावतीकरण केले आहे.ते यशस्वी होवून अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सोडविण्यासाठी कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ही ४००० मे.टनावरुन ६००० मे.टनापर्यंत वाढविली आहे.परंतु चालू वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झालेला असून आपल्याकडील उपलब्ध सर्व ऊस कारखान्यास गाळपाकरीता द्यावा व दुष्काळी परिस्थिती पाहता काटकसर करून शेतकऱ्यांनी समारंभ कमी खर्चात करावे असे आवाहन करण्यास ते विसरले नाही.
सदर प्रसंगी प्रास्तविक उपाध्यक्ष डॉ.बर्डे यांनी केले तर सूत्रसंचालन माजी संचालक अरुण चंद्रे यांनी केले.तर अहवाल वाचन प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले आहे.यावेळी विषय पत्रिकेवरील १ ते १० विषय टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजूर करण्यात आले.उपस्थितांचे आभार संचालक सचिन चांदगुडे यांनी मानले आहे.