आरोग्य
कोपरगावात…या मंचच्या वतीने,’आरोग्य शिबिर’ उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.त्याचा अनेकांनी लाभ घेतला आहे.
सध्याच्या धावपळीच्या युगात मधुमेह हा सर्वसामान्य आजाराप्रमाणे पसरत आहे.या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास याचे परिणाम शरीरावर होतात.मात्र,याचा मोठा फटका बसतो तो डोळ्यांना.डोळ्यांच्या आतील नेत्र-पटलावर म्हणजे रेटीनावर देखील मधुमेहाचे दुष्परिणाम होऊन पूर्णपणे अंधत्त्व येण्याची शक्यता असते.हे टाळण्यासाठी वेळीच निदान होऊन त्यावर उपचार होणे गरजेचे असते.त्यामुळेच मोफत नेत्र तपासणी शिबिर अ.नगर येथील श्री आनंद ऋषी हाॅसपिटल यांच्या वतीने व कै.गोकुळचंद रुपचंद कोठारी यांच्या स्मरणार्थ,चंद्रकला दिनेश कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त,कै.मोतीलाल अमोलचंद शिंगि यांच्या स्मरणार्थ,श्रीमती शकुंतलाबाई मोतीलाल शिंगी परीवाराचया सहकार्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाताई ठोळे या होत्या.
सदर प्रसंगी डॉ.विलास आचारी,कार्याध्यक्ष विजय बंब,सुधाताई ठोळे,आदी प्रमुख मान्यवरांसह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.या नेत्र तपासणी शिबिर प्रसंगी शहर व तालुक्यातील दोनशे पेक्षा जास्त रुग्णांना मोफत तपासण्यात आले.विस ते तीस रुग्णांना अ.नगर येथे शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले आहे.
सदर प्रसंगी प्रास्ताविक डॉ.विलास आचारी यांनी केले कार्याध्यक्ष विजय बंब यांनी उपक्रमाची माहिती दिली आहे.सदर शिबिराच्या यशस्वितेसाठी साई गावं पालखी सोहळ्याचे सभासद,मुंबादेवी तरुण मंडळाचे सभासद व जेष्ठ नागरिक सेवा मंचचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी शैलजा रोहोम,सुवालाल भंडारी,श्री ससाणे,पेंटर महंमद दारुवाला,परसराम भावसार यांच्या सह कोठारी व शिंगी परीवाराचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.