आंदोलन
‘मराठा समाज आरक्षण’ आंदोलन कर्त्यांनी प्रकृती खालावली !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यासह कोपरगाव येथे देखील मराठा समाजाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे या सर्व आंदोलनांची तातडीने दखल घेवून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.दरम्यान आज तिसऱ्या दिवशी आंदोलन कर्त्यांनी प्रकृती खालावली असल्याचे दिसून आले आहे.
जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू असताना पोलिसांनी लाठीमार केला.यानंतर झालेल्या झटापटीत आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले.या घटनेनंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.कोपरगावात मराठा समाजाच्या वतीने अड्.योगेश खालकर,अनिल गायकवाड,विजय भगत आदीं कार्यकर्त्यानी,’आमरण उपोषण’ सुरु केले असून त्याचा आज तिसरा दिवस असताना त्या आंदोलनाला पाठींबा वाढत असताना दिसून आला आहे.अशातच कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत या आंदोलनाची दखल घेण्याची मागणी केली आहे.
सदर निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की,” मराठा समाजाने सुरु केलेल्या या आंदोलनाची तातडीने दखल घेवून मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करावी.कोपरगाव विधानसभा मतदार संघातील कोळगाव थडी गावामध्ये अज्ञात व्यक्तीकडून मुस्लिम बांधवांच्या पवित्र कुराणची विटंबना करण्याची घटना घडलेली आहे.कोपरगाव मतदार संघात वर्षानुवर्षापासून सर्व जाती धर्माचे नागरिक गुण्या गोविंदाने राहत आहे.मात्र जाती धर्माच्या नावाखाली समाजा-समाजात तेढ निर्माण होवून मतदार संघात असलेला जातीय सलोखा व एकोप्याला दुभंगण्यासाठी करण्यात आलेल्या या खोडसाळ घटनेची सखोल चौकशी करून या घटनेतील दोषींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी देखील आ.काळे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना दिलेल्या निवेदनात शेवटी केली आहे.
दरम्यान आज तिसऱ्या दिवशी सुरु असलेल्या आंदोलनाला कोपरगावात जेष्ठ नागरिक सेवा मंच,कोपरगाव तालुका फोटोग्राफर संघटना,कोपरगाव तालुका डॉक्टर संघटना,शिवसेना शिंदे गट,सहकारी पतसंस्था,ग्रामपंचायती,सामाजिक संघटना,विविध मंडळे,आदींनी आपला पाठींबा दर्शवला आहे.दरम्यान आज तिसऱ्या दिवशी प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी भेट घेऊन आंदोलनकर्त्यांची मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे पाठविण्याचे आश्वासन नाकारले त्यांचेशी बोलण्याचे टाळले आहे.दरम्यान प्रांताधिकारी यांनी लेखी आश्वासन देण्यास नकार दिल्याने आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती फेटाळली आहे.मात्र आंदोलनकर्त्यांची तिसऱ्या दिवशी प्रकृती खालावली असल्याचे निदर्शनास आले आहे.