व्यापार विषयक
कांदा लिलावाबाबद कोपगावात संभ्रम !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढवून ४० टक्के इतकं केलं आहे.केंद्राच्या या निर्णयाविरोधात नगरमधील बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी कांद्याची खरेदी-विक्री बेमुदत काळासाठी बंद केली आहे.या निर्णयाविरोधात शेतकरी आणि व्यापारी हे दोन्हीही घटक अत्यंत आक्रमक झाले असताना कोपरगाव बाजार समिती मात्र उद्या कांदा बाजार सुरु करणार नसल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे शेतकरी नाराज असल्याचे समजते.मात्र यास सचिवांनी मात्र नकार दिला आहे.
“कांदा व्यापारी व शेतकऱ्यांची कांदा बिले वेळेत देत नसल्याने त्याबाबत बाजार समितीच्या पदाधिकारी आणि व्यापारी यांची बैठक सकाळी १० वाजता आयोजित केली असल्याच्या बातमीस समितीचे सचिव नानासाहेब रनशूर यांनी दुजोरा दिला असून कांदा लिलाव सुरु करणार असल्याचे सांगितले आहे.तथापी त्यास छेद देत मात्र काही शेतकऱ्यांनी केवळ शिरसगाव-तिळवणी येथील कांदा बाजार सुरु राहणार असल्याचे सांगितले आहे.व त्यास सामाजिक संकेतस्थळावरील बातम्या पाठवल्या आहेत.
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत नुकतीच केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली होती.यावेळी गोयल यांनी राज्यातील दोन लाख मेट्रिक टन कांदा ‘नाफेड’ कडून ०२ हजार ४१० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी असल्याचं आश्वासन दिलं.मात्र निर्यात शुल्काबाबत ठोस निर्णय झाला नाही.त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी अजूनही त्यांच्या भूमिकेवर कायम आहेत.त्यामुळे नाशिक बाजार समित्यांचे लिलाव सुरु करावे असे आवाहन अ.नगर जिल्हा सहाय्यक निबंधक यांनी केले आहे अन्यथा आपण त्याचे परवाना रद्द करू असा इशारा दिला असताना कोपरगावात मात्र बाजार समिती व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचत असतांना दिसत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.लासलगाव बाजार समिती बंद असल्याचा फायदा कोपरगाव तालुक्यातील व्यापाऱ्यांनी घेतला असून त्यांनी भरुन ठेवलेला कांदा बाहेर काढला आहे.मात्र कोपरगाव बाजार समिती उद्या बंद ठेवली जाणार असल्याची माहिती हाती आली आहे.व त्या ऐवजी त्यांनी व्यापारी आणि संचालक मंडळ आदींची बैठक आयोजित केली आहे.मात्र शेतकरी त्या फायद्यापासून वंचित राहताना दिसत आहे.
दरम्यान आता राज्यातील इतर बाजार समित्या प्रमाणे अ.नगर जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीतील व्यापाऱ्यांना ईशारा दिला आहे.उद्या पर्यंत कांदा खरेदी सुरु न केल्यास व्यापाऱ्यांचे लायसन्स रद्द करण्यात येतील असा ईशारा त्यांनी व्यापाऱ्यांना दिला आहे.बाजार समिती कायद्यात तशा प्रकारची तरतूद असून व्यापाऱ्यांना खरेदी विक्री सुरू करण्यासाठी नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू आहे.मात्र उद्यापर्यंत कांदा खरेदी सुरू न केल्यास लायसन्स रद्द केले जातील असं उपनिबंधकांनी म्हटलं आहे.त्यामुळे कोपरगाव बाजार समिती काय निर्णय घेणार याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागून आहे.
या संबंधी आमच्या प्रतिनिधीने साहाय्याने निबंधक यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”आपण रजेवर असल्याचे सांगितले असून त्याबाबत बाजार समितीशी संपर्क साधण्यास” सांगितले आहे.त्याबाबत बाजार समितीचे सचिव नानासाहेब रनशूर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”कांदा व्यापारी व शेतकऱ्यांची कांदा बिले वेळेत देत नसल्याने त्याबाबत बाजार समितीच्या पदाधिकारी आणि व्यापारी यांची बैठक सकाळी १० वाजता आयोजित केली असल्याच्या बातमीस दुजोरा दिला असला तरी मात्र कांदा लिलाव सुरु करणार असल्याचे सांगितले आहे.मात्र काही शेतकऱ्यांनी शिरसगाव-तिळवणी येथील कांदा बाजार सुरु राहणार असल्याचे सांगितले आहे.मात्र कोपरगाव बाजार समिती बंद राहणार असल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.