अभिष्टचिंतन कार्यक्रम
आ.काळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार व साईबाबा विश्वस्त व्यवस्थेचे माजी अध्यक्ष आशुतोष काळे यांनी वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहर आणि तालुक्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी मोठ्या उत्साहात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.अनेकांनी त्यांना समक्ष भेटून आपल्या शुभेच्छा दिल्या असून त्यासाठी दिवसभर कार्यकर्त्यांची रिघ दिसून आली आहे.
दरम्यान सांयकाळी कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी वाढदिवसानिमित्त साईबाबांचे दर्शन घेऊन मतदार संघातील शेतकऱ्यांच्या खरिप पिकांसाठी पाऊस व जनतेच्या सुख-शांतीसाठी प्रार्थना केल्याचे माहिती हाती आली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे हे सन-२०१९ साली निवडून आल्यानंतर त्यांनी शहराचा पाणी प्रश्न मोठया अग्रक्रमाने सोडविण्यास प्राधान्य दिले विनाकारण निळवंडेचे अवास्तव गाजर दाखवले नाही.वितरण व्यवस्थेतील दोष दूर करण्यास प्राधान्य दिले असून पाच क्रमांकांचा साठवण तलावास प्राधान्य दिले असून ते काम प्रगतीवर असल्याचे दिसत असून त्यांनी त्या नंतर आपल्या कार्यकाळात तालुक्यातील रस्त्यांची जी वाट लागली होती त्याकडे लक्ष दिले असून तालुक्यातील बहुतांशी रस्ते मार्गी लावले असून उर्वरित रस्ते त्यांनी आगामी काळात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.त्यांनतर जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील गावातील नागरिकांना घर-घर नळ देण्यासाठी प्राधान्य दिले आहे.या शिवाय कोपरगाव तालुक्यातून गोदावरी नदी वाहत असून तिच्या काठावर अनेक तिर्थक्षेत्रे आहेत.त्या तिर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग मिळावा या साठी त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवले आहे.त्यास त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले आहे.
कोपरगाव शहरातील विविध उपनगरातील काही भागातील गरीब विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले आहे.तर कन्या शाळेतील विद्यार्थिनींनीना वह्या वाटप करण्यात आले असल्याची माहिती डॉ.अनिरुद्ध काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेचे माध्यमातून विविध योजना सामान्य नागरिकांना पुरविल्या आहेत.दर महिन्याच्या पहिल्या वारी अपंगांना जिल्हा आरोग्य केंद्रात नेऊन त्यांना अपंग असल्याचे प्रमाणपत्र मिळवून देण्यास प्राधान्य दिले आहे.त्याचा अनेक दिव्यांगांना लाभ मिळाला आहे.त्यामुळे त्यानाच्या वाढदिवसासाठी गर्दी असणे स्वाभाविक मानले जात आहे.
दरम्यान आज आयोजित विविध कार्यक्रमात सुभद्रानगर,निवारा आदी परिसरात असलेल्या गणपती मंदिर आणि लक्ष्मी मंदिर परिसरात स्वच्छता राबविण्यासह सूक्ष्म किटकापासून बचाव करण्यासाठी औषध फवारणी करण्यात आली असल्याची माहिती माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांनी दिली आहे.
दरम्यान त्यांनी आज सकाळी ०८ ते दुपारी ०४ वाजे पर्यंत आपल्या गौतमनगर येथील कारखाना कार्यस्थळावरील कार्यालयात कार्यकर्त्यांच्या सुभेच्छांचा स्वीकार केला आहे.मात्र तालुक्यातील कार्यकर्त्यानी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणतेही हार-फुले,शाली,बुके,पूष्पगुच्छ आदी आणण्याचे टाळावे असे आवाहन त्यांनी केले होते मात्र तो नियम स्थानिक कार्यकर्त्यांनी पाळला असल्याचे दिसून आले असले तरी बाहेरगावाहून आलेले हितचिंतक आदींनी मात्र तो नियम पाळला असल्याचे दिसून आलें नाही.
दरम्यान आज आयोजित विविध कार्यक्रमात सुभद्रानगर,निवारा आदी परिसरात असलेल्या गणपती मंदिर आणि लक्ष्मी मंदिर परिसरात स्वच्छता राबविण्यासह सूक्ष्म किटकापासून बचाव करण्यासाठी औषध फवारणी करण्यात आली असल्याची माहिती माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांनी दिली आहे.शिवाय या भागात काही ठिकाणी वृक्षारोपन करण्यासह नागरिकांना जनहितार्थ सुमारे चार बाकडे अर्पण केले आहे.तर काही भागातील गरीब विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले आहे.तर कन्या शाळेतील विद्यार्थिनींनीना वह्या वाटप करण्यात आले असल्याची माहिती डॉ.अनिरुद्ध काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.आलेल्या हितचिंतकाना अल्पोपहाराचे आयोजन केले असल्याची माहिती हाती आली आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी गटनेते विरेन बोरावके,माजी नगरसेवक मंदार पहाडे,कृष्णा आढाव,लतिका म्हस्के,मनिषा म्हस्के,वाल्मिक लहिरे,सोमनाथ आढाव,संदीप सावतडकर,प्रशांत वाबळे,योगेश वाणी,राजेंद्र बोरावके,राजेंद्र पाखले,विजय आढाव,कार्तिक सरदार,पप्पू गोसावी,विशाल निकम,आकाश गायकवाड,योगेश वाळुंज,आनंद डिके,माजी नगरसेविका प्रतिभा शिलेदार,वर्षा गंगुले,स्वप्नजा वाबळे,मायदेवी खरे,बोरुडे ताई आदींसह दिनकर खरे,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुभाष दरेकर,सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी बहु संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,सोशल मिडिया अध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के यांचेतर्फे रयत शिक्षण संस्थेचे पद्मा मेहता विद्यामंदिर येथे स्कूल बॅग वाटप करण्यात आले आहे.