जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अभिष्टचिंतन कार्यक्रम

कोपरगावात ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त कोपरगाव तालुका शिवसेनेच्या वतीने श्री क्षेत्र राघवेश्वर मंदिरात राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत महाअभिषेक आयोजित करण्यात आला होता.

“राज्यातील सामान्य जनता वर्तमान राजकीय परिस्थितीमुळे संभ्रमात आहे.संपूर्ण जगाने कोविड काळात मान्य केलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी महाराष्ट्र राज्याच्या जनतेची अपेक्षा आहे”-प्रमोद लबडे,अध्यक्ष,उत्तर नगर जिल्हा शिवसेना.

राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस एकाच दिवशी होता.रायगडमधील इर्शाळवाडीत घडलेल्या दुर्घटनेमुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला.आता उद्धव ठाकरेंनी देखील आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता.व त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांनी पुष्पहार घेऊन मातोश्रीवर येऊ,नये असे आवाहनही त्यांनी केले होते.त्यानुसार उत्तर नगर जिल्ह्यातही सदरचा वाढदिवस साजरा करता आलेला नाही त्यासाठी उत्तर नगर जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे यांनी आज त्या निमित्त कोपरगाव तालुक्यातील गोदावरी तीरी असलेले श्री क्षेत्र कुंभारी येथे राघवेश्वर मंदिरात महाभिषेक केला आहे.व कुंभारी येथील गोशाळेस चारा अर्पण करण्यासह आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले आहे.

सदर प्रसंगी महिला जिल्हा आघाडी प्रमुख सपना मोरे,कोपरगाव शहर शिवसेनेचे शहराध्यक्ष सनी वाघ,तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे,माजी शहराध्यक्ष भरत मोरे,अस्लम शेख,उपशहर प्रमुख गगन हाडा,माजी आरोग्य सभापती अनिल आव्हाड,सिद्धार्थ शेळके,रवींद्र कलथे,राखी विसपुते,राजू शेख,राहुल होन,उपतालुकाप्रमुख रंगनाथ गव्हाणे,धर्मा जावळे,कृष्णा अहिरे,चंद्रकांत भिंगारे,पोहेगाव येथील जिल्हा परिषद गटनेते शिवाजी रोहमारे,गिरीधर पवार,भाऊसाहेब व्हरे,भूषण पाटणकर,राजू कदम आदी मान्यवरांसह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.त्यावेळी उद्धव ठाकरे यांना दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close