कोपरगाव तालुका
शासनाच्या दारी गोंधळ ! कोपरगावातील नवा प्रकार
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगावात शिर्डी लोकसभा मतदार ‘शासन आपल्या दारी’हा उपक्रम नुकताच कोपरगाव तहसील कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला असला तरी या कार्यक्रमात शिवसेना उद्धव गटाचे माजी शहराध्यक्ष भरत मोरे यांनी तहसील समोर बेशिस्त वहातुकीबाबत खा.सदाशिव लोखंडे आणि तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना जाहीर जाब विचारल्याने,’शासन आपल्या दारी’ या योजनेत,’शासनाच्या दारी गोंधळ’ असे चित्र दुर्दैवाने पहावयास मिळाले आहे.त्यामुळे त्या बाबत उलट सुलत चर्चेला उधाण आले आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.लोखंडे हे बऱ्याच वेळा मतदार संघात असत नाही.असले तरी ते कार्यकर्त्याना भेट नाही.शिवाय त्यांचे मतदार संघात त्यांच्या खासदार निधीतील विकास वा केंद्र सरकारमधून स्पेशल मंजुर करून आणलेले काम व आर्थिक निधी दिल्याचे दिसत नाही.त्यामुळे मतदार संघातील मतदार आणि नागरिकांत अच्छि-खांसी नाराजी आहे.व आपले दहा वर्ष वाया गेल्याच्या प्रतिक्रिया स्वाभाविकपणे उमटताना दिसत आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी वर्तमानपत्रात,सामाजिक संकेतस्थळवर खासदार लोखंडे हरवले आहे.खा.लोखंडे दिसले का ? अशा मथळ्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात.
कोपरगाव येथील’शासन आपल्या दारी’ या योजनेच्या कार्यक्रमात खा.लोखंडे आणि तहसीलदार भोसले यांना या बेशिस्त वाहतुकीबाबत शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष भरत मोरे यांनी खूप खरीखोटी सुनावली त्याचे छायाचित्र दिसत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे.समाजातील सर्व तळागाळातील घटकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.या अभियानाचा कार्यक्रम नुकताच कोपरगाव तहसील कार्यालयात खा.सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे.त्यावेळी हा राडा झाला आहे.
सदर प्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते,तालुकाध्यक्ष थोरात,तहसीलदार संदीपकुमार भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.लोखंडे हे बऱ्याच वेळा मतदार संघात असत नाही.असले तरी ते कार्यकर्त्याना भेट नाही.शिवाय त्यांचे मतदार संघात त्यांच्या खासदार निधीतील विकास वा केंद्र सरकारमधून स्पेशल मंजुर करून आणलेले काम व आर्थिक निधी दिल्याचे दिसत नाही.त्यामुळे मतदार संघातील मतदार आणि नागरिकांत अच्छि-खांसी नाराजी आहे.व आपले दहा वर्ष वाया गेल्याच्या प्रतिक्रिया स्वाभाविकपणे उमटताना दिसत आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी वर्तमानपत्रात,सामाजिक संकेतस्थळवर खासदार लोखंडे हरवले आहे.खा.लोखंडे दिसले का ? अशा मथळ्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात.त्यामुळे ‘ती’ नाराजी कोठे ना कोठे प्रकट होत असते.अशीच घटना कोपरगाव तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या,’शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात नुकतीच घडली आहे.
त्यावेळी सदर बैठक सुरु असताना या कार्यक्रमास आलेल्या,” खा.लोखंडे यांच्या कार्यकर्त्यानी तहसील कार्यालयात रस्त्यावर आपल्या गाड्या बेशिस्त लावल्या होत्या” असा आरोप भरत मोरे यांनी केला असून त्यांनी आपली दुचाकी आपल्या काही कामानिमित्त तहसील कार्यालयात आणण्याचा प्रयत्न केला असता ते असफल झाल्याने त्यांनी सदर दुचाकींचा हॉर्न सुरु ठेवून त्याकडे ‘लक्षवेध’ करण्याचा असफल प्रयत्न केला होता.मात्र त्या कडे ना महसुली अधिकाऱ्यांनी पाहिले ना शहर पोलिसांनी. परिणाम स्वरूप त्यांचा रागाचा पारा चढला होता.त्यावेळी त्यांनी काहीही मागचा पुढचा विचार न करता ते ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या स्थळी असलेल्या सभागृहात गेले होते.त्यावेळी त्यांनी खा.लोखंडे आणि तहसीलदार भोसले यांना या बेशिस्त वाहतुकीबाबत खरीखोटी सुनावली आहे.त्या सोबत त्यांनी सदर गोंधळाचे चित्रीकरण करण्यास ते विसरले नाही हे विशेष ! (त्यामुळे तर सर्वच गोंधळ प्रसिद्धी माध्यमांसमोर आला आहे.) दरम्यान मोरे यांच्या रागाचा पारा कमी करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांनी करून पहिला मात्र त्यात त्यांना अपयश आले असता सदर गोंधळ वाढतच चालल्याने तेथे उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना व पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे.व त्यांना बाहेर पाठवणी केली आहे.त्यामुळे सदर प्रसंगी ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाऐवजी,’शासनाच्या दारी गोंधळ’ हा कार्यक्रम संपन्न झाला असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी नोंदवल्या आहेत.त्यामुळे कोपरगावसह उत्तर नगर जिल्ह्यात या घटनेबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.