जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
संपादकीय

…इति ‘गणेश विजयाचे महापुराण’

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

राहाता तालुक्याची कामधेनु असलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपचे कोल्हे,व काँग्रेसच्या माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात युतीने जिंकली असून या निवडणुकीनंतर नवनिर्वाचित संचालकांमधून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.त्या निवडीत नूतन अध्यक्ष म्हणून सुधीर वसंतराव लहारे तर उपाध्यक्ष म्हणून विजय भानुदास दंडवते यांची एकमताने निवड प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली आहे.त्या पदाधिकाऱ्यांची प्रथम अभिनंदन आणि पुढील वाटचालीस ‘जनशक्ती न्यूजसेवा’ पोर्टलच्या वतीने शुभेच्छा !

‘गणेश’च्या निवडणुकीत डॉ.एकनाथ गोंदकर यांनी माजी मंत्री थोरात व अड्.अजित काळे यांची मदत घेऊन तांत्रिक बाबी व विखे यांची ‘ती’ दहशत मोडून काढली होती.त्यामुळे कोणी कितीही ऊर बडवत असले तरी त्यात खरे पणा नाही.वास्तविक ‘गणेश’ परिसरातील सभासद आणि कार्यकर्ते स्वाभिमानी बाण्याचे असल्याचे वारंवार दिसून आले आहे.त्यामुळे या परिसरावर विखे यांना बऱ्याच वेळा तोंडघशी पडण्याचा अनास्था प्रसंग आलेला आहे.

सर्वसामान्य मतदार हा विचारसरणीचा विचार करून मत देतो हाच मुळात एक मोठा भ्रम आहे.आपल्यासमोर उपलब्ध पर्याय काय आहेत आणि त्यातल्या त्यात.’आपल्यासाठी कमीतकमी कोण वाईट’ असा विचार मतदारांचा असतो आणि त्या आधारे सत्ताबदलाच्या बाजूने वा विरोधात ते मतदान करतात.वरवर पाहता हे विधान तुच्छतादर्शक असले तरी खोल विचारांती त्याची सत्यता जाणवेल,मतदार आपल्यासमोर कोणकोणते पदार्थ आहेत आणि त्यातला कोणता चवीला आणि भूक भागवायला योग्य असेल याचा विचार करून राजकीय पक्ष निवडतात.’गणेश सहकारी कारखाना निवडणूक’याचे ताजे उदाहरण ठरावा.या सहकारी कारखान्याच्या निवडणूकीचा वास्तविक संजीवनी गडाचे युवा नेते विवेक कोल्हे यांचा अपेक्षेपेक्षा खूपच जिल्ह्यात आणि राज्यात त्या मानाने खूप गवगवा करण्यात आला आहे.त्यामुळे खरेच हा विजय वास्तवाला धरून आहे का असा सवाल निर्माण झाल्या शिवाय राहत नाही.त्यामुळे या नवख्या तरुणांच्या तुलनेत खरंच या निवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांची खराब कामगिरी झाली का ? असा सवाल कोणीही सुज्ञास न पडला तर नवल.कोपरगाव सहकारी कारखान्यानंतर जिल्ह्यात तिसरा सहकारी तत्त्वावरील कारखाना म्हटले तर नवल नको कारण हा कारखाना,संजीवनी आधी स्थापन झाला आहे.आणि तो कॉ.बाबुराव कडू,रावबहादूर बोरावके,बाजीराव कोते,कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती हरिभाऊ शेळके आदींनी शेतकरी हित डोळ्यासमोर ठेऊन एकत्र येऊन स्थापन केला होता.मात्र त्यानंतर सन-१९८५ वगळता हा कधीच निवडणुकीने माजी केंद्रीय मंत्री स्व.बाळासाहेब विखे आणि त्यानंतर वर्तमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना जिंकता आलेला नाही.कारण या कारखान्याचे कार्यक्षेत्र हेच मुळी सन-२०००च्या आतील कोपरगाव तालुक्याचे कार्यक्षेत्र आहे हि विशेष बाब वाचकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.व या कार्यक्षेत्रात माजी मंत्री शंकरराव कोल्हे आणि माजी मंत्री शंकरराव काळे यांचा प्रभाव राहिला आहे.आज त्याचे नातू नेतृत्व करीत आहे.या शिवाय या सहकारी नेत्यांनी आपल्या भोवती नेहमी एक अदृश्य लक्ष्मण रेखा आखून कोणी कोणाच्या कार्यक्षेत्रात चुबूकडुबुक करायची नाही या तत्वावर आपले राजकारण आणि वतने सांभाळली आहे हे उल्लेखनीय आहे.याबाबत त्यांच्या विविध आत्मचरित्रात उल्लेख आलेले आहे.त्यामुळे विखेंचा या भागात फार लुडबुड नव्हती हे ओघाने आलेच.त्यांचीच नाही तर शिर्डी मतदार संघातील लोणी आणि चाळीस गावांत काळे आणि कोल्हे यांचीच नाही तर थोरातांनीही चुबूकडूबुक नव्हती हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही.नाही तरी शेजारी असतानाही माजी महसूल मंत्री थोरात यांनी शेजारच्या तालुक्यात किती काँग्रेस वाढवली हा प्रश्न जसा निरुत्तर करणारा आहे तशीच एक १९९७-९८चा कोपरगाव तालुक्यातील गोदावरी तालुका दूध संघाचा अपवाद वगळता विखेंची स्थिती म्हटले तर वावगे वाटणार नाही.

राजकारण हा तर जिवंतपणाचा खळाळता प्रवाह…तो कुणासाठीही थांबत नसतो.काळाबरोबर ते पुढे जाते.तेंव्हा मागे कोण राहिले याची राजकारणास पर्वा नसते.थोडक्यात राजकारणातील भूतकाळ हा केवळ इतिहास असतो.आणि वर्तमानाशी त्याचा संबंध असतोच असे नाही.नेते मंडळी आज काय बोलतात याचा उद्याशी काही संबंध नसतो.म्हणूच या परिसरातील नेते काय बोलतील याचा उद्याशी काही संबंध नसतो याची आठवण ठेवावी असे म्हटले तर वावगे ठरु नये अशी येथील स्थिती.यांनी हि निवडणूक खरे तर बिनविरोध करायचे ठरवले होते.मात्र शेतकरी संघटना आडवी आली आणि यांचे मुसळ केरात गेले असे म्हटलं जातं.त्यामुळे निवडणुकी नंतर विखे यांनी. “निवडणूक करायची नाही असे आमचे ठरले होते” असे म्हटले होते.पण.. याचे कारण वर आले आहे.

दरम्यान हि निवडणूक लावण्यास पहिले कारण ठरले ‘ते’ शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांचे.या आधी आमच्या प्रतिनिधीने या बाबत लिहिले होते.राहाता येथील,’एकनाथ मंगल कार्यालया’त त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आणि चित्रच पालटून गेले.त्यासाठी त्यांनी १५ एप्रिल रोजी काकडी खंडोबा मंदिरात पहिली सभा घेतली तो पर्यंत ‘कोल्हे’ आणि ‘थोरात’ गट निपचित पडलेले होते.त्यांची याबाबत नामनिर्देशन पत्र भरे पर्यंत डॉ.एकनाथ गोंदकर वगळता या दोन्ही गटात शुकशुकाट होता.हे निर्विवाद सत्य आहे.मात्र आपल्यापेक्षा कमी तुल्यबळ असलेल्या कार्यकर्त्यास वा नेत्यास अनुल्लेखाने मारणे हि खरी तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जुनी खोड.त्यानुसार त्यांनी या लढाईचे पूर्ण श्रेय डॉ.गोंदकरांचे असताना त्यांना अडगळीत टाकण्याचे काम या मंडळींनी इमानेइतबारे केले ते आपल्या जुन्या खोडी प्रमाणेच यात काडीमात्र संशय नाही.शेतकरी संघटनेला आणि डॉ.गोंदकर यांना बळ पुरवले ते आधी आठ-दहा वर्ष विखेंच्या ताब्यात असलेल्या गणेश सहकारी कारखान्याने कामगारांची कधीच वेळेवर न दिलेली देयके,सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊनही निवृत्ती पश्चात न दिलेली देणी त्यामुळे नाराज कामगार संघटना या प्रशासनाच्या विरुद्ध गेल्या होत्या.त्यातले त्यात भर पडली ती शेतकऱ्यांना कधीच वेळेवर न मिळणारी तुलनेने कमी मिळणारी उसाची देयके आदी प्रश्नानीं शेतकऱ्यांची विखेंवर नाराजी ओढवली होती.त्यामुळे या असंतोषाची धग आणि भर वाढत गेली होती परिणाम समोर आले आहेच.मात्र आज जो तो आपले ढोल आणि ऊर बडवून आणि स्वतःच्या अंगावर गुलाल उधळून घेत आहे.व आपण किती मोठी शिकार केली असा आव आणत आहे.तो मुळीच वस्तुस्थितीला धरून नाही.त्यामुळे हा शब्द प्रपंच.

शेतकरी संघटनेला आणि डॉ.गोंदकर यांना बळ पुरवले ते आधी आठ-दहा वर्ष विखेंच्या ताब्यात असलेल्या गणेश सहकारी कारखान्याने कामगारांची कधीच वेळेवर न दिलेली देयके,सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊनही निवृत्ती पश्चात न दिलेली देणी त्यामुळे नाराज कामगार संघटना या प्रशासनाच्या विरुद्ध गेल्या होत्या.त्यातले त्यात भर पडली ती शेतकऱ्यांना कधीच वेळेवर न मिळणारी तुलनेने कमी मिळणारी उसाची देयके आदी प्रश्नानीं शेतकऱ्यांची विखेंवर नाराजी ओढवली होती.त्यामुळे या असंतोषाची ‘धग’ आणि ‘भर’ वाढत गेली होती परिणाम समोर आले आहेच.

खरे तर हि गुलाल उधळणारी मंडळी एवढ्या मोठया विजयाला पात्र असतील त्यांनी दोन प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी.सन-२००६ च्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोल्हे आणि विखे दोन्ही गट एकत्र लढले असताना व डॉ.एकनाथ गोंदकर यांना काही अपवाद वगळता कोणतेही मोठे राजकीय बळ नसताना २३ पैकी ०९ जागा कशा मिळाल्या होत्या ? उर्वरित ०३-०४ जागा अवघ्या ०४-१२ मतांनी गेल्या होत्या हा इतिहास असताना तो पूर्ण पणे डावलला व दुर्लक्षित केला जात आहे.व दुसरा तुम्ही एवढे कर्तव्यदक्ष होते तर तुम्हाला छोट्याशा कर्जासाठी तुमच्या समर्थकांना ‘गणेश’ सोडून का पळावे लागले होते ? व तो कारखाना प्रवराच्या ताब्यात का द्यावा लागला होता ? याला कोण जबाबदार होते ? याची उत्तरे जनतेला द्यायला हवी.मात्र त्या प्रश्नांना कोणीही भिडणार नाही हे ओघाने आलेच.म्हणजेच,’विजयाला हजारो बाप असतात मात्र पराभवाला कोणीही वाली होत नाही’ हेच खरे यावर विश्वास ठेवायला जागा आहे.’गाडी अडवली आणि तुम्ही निवडणूक हातात घ्या’ या साऱ्या गावगप्पा आहेत हे सर्व घडवून आणलेलं नाट्य आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही हा या मंडळींचा जुना आवडता खेळ आहे.

दुसरे निमित्त झाले ‘ते’ राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निडणुकीच्या निमित्ताने.या निवडणुकीत राहाता तालुक्यातील आपल्या कार्यकर्त्याना कोल्हे यांनी काही जागा मागितल्या होत्या मात्र त्या देण्यास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता.त्यामुळे त्या संघर्षाची ठिणगी पडली होती असे मानले जाते.त्यातून डॉ.गोंदकर यांनी या नाराजांना आपल्या बाजूने वळवले होते.व त्यांची मोट बांधून सदरची निवडणूक लढवली होती.व त्यांच्या एक लोणी खुर्द ग्रामपंचायत व एक सोसायटी सोसायटी वगळता कोणतीही अन्य स्थानिक स्वराज्य संस्था नसताना जवळपास ३५ टक्के मते मिळवली होती.त्यामुळे नाराज कोल्हे गट (म्हणजे राहाता तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अशी गणिते केवळ उत्तर नगर जिल्ह्यात जुळू शकतात) गणेशच्या निवडणुकीत एकत्र आला होता.मात्र बरीच वर्षे म्हणजे जवळपास दहा-अकरा वर्ष जसा गणेश कारखाना विखेंच्या ताब्यात गेला होता ‘तो’ पासून कोल्हे गट सक्रिय राहिला नव्हता.व ‘हा गट आता आपला झाला आहे’ हे गृहीतक विखे गटास भोवले असून त्यामुळे त्या बापलेकांनी आपल्याशी गद्दारी करणाऱ्या सभासदांना १९ तारखेनंतर.”पाहून घेऊचा” दम देण्याचे काम सुरु ठेवले होते.

गणेश सह संजीवनी आणि कोपरगाव या तीन सहकारी कारखान्यांनी गणेश करार करून ‘कोसंग’नावाचा आसवणी (डिस्टिलरी) प्रकल्प उभारला होता.त्यातून गणेश वगळता उर्वरीत कारखान्यांनी आपली मोठी आर्थिक प्रगती करून ‘गणेश’ पासून फारकत घेतली होती.या कोपरगाव आणि संजीवनी यांचे ‘बॉबी’,’भिंगरी’चे ‘आसवनी प्रकल्प’ हे राज्यात अग्रणी समजले जातात व त्यातून जवळपास १५००-१६०० कोटींचा महसूल राज्याच्या तिजोरीत भरला जातो तर ‘गणेश’चा प्रकल्प कोणाच्याही खिजगणतीत नाही ? याला कोण जबाबदार आहे हे आज ‘गणेश’च्या स्वप्नांचे इमले दाखविणाऱ्यानीं जाहीर करायला हवे आहे.

खरंतर या निवडणुकीत आपण ‘अशोक’ आणि ‘मुळा-प्रवरा’च्या निवडणुकीसारखी सभासदांना तीन वर्षे ऊस पुरवठ्याचे कोणतेही दाखले प्रशासनावरील राजकीय दबावातून उपलब्ध करून देणार नाही हि मस्ती बऱ्यापैकी विखे यांना नडली आहे.त्यामुळे सभासद पेटून उठला होता.त्यास डॉ.गोंदकर यांनी माजी मंत्री थोरात व अड्.अजित काळे यांची मदत घेऊन तांत्रिक बाबी व त्यांची ‘ती’ दहशत मोडून काढली होती.त्यामुळे कोणी कितीही ऊर बडवत असले तरी त्यात खरे पणा नाही.वास्तविक ‘गणेश’ परिसरातील सभासद आणि कार्यकर्ते स्वाभिमानी बाण्याचे असल्याचे वारंवार दिसून आले आहे.त्यांना माजी मंत्री कोल्हेनी वेळोवेळी बळ पुरवले होते.त्यामुळे या परिसरावर विखे यांना बऱ्याच वेळा तोंडघशी पडण्याचा अनास्था प्रसंग आलेला आहे.आताच प्रसंग या त्या पठडीतील आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

ज्या कारखान्यात विखे आणि काळे-कोल्हे यांचा चंचूप्रवेश झाला नव्हता त्यावेळी म्हणजेच या पूर्वी सन-१९६८-७० साली राज्यात सर्वाधिक ऊसास भाव दिला आहे.व ज्या साखर कारखान्याने सन-१९९७-९८ साली साखर उताऱ्यात देशात दुसरा क्रमांक मिळवला आहे.विशेष म्हणजे याच कारखान्याने या पूर्वी चितळी-गणेशनगर,एकरुखे ते रुई,आदी रस्ते स्वखर्चाने विकत घेऊन विकसित केले होते.तो कारखाना खरे तर या परिसरात जवळचे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांची लुडबुड वाढल्याने आतबट्ट्यात आला आहे हे येथे लक्षात घेणे जरुरी आहे.त्या पूर्वीचा एक दाखला देणे गरजेचे आहे.गणेश सह संजीवनी आणि कोपरगाव या तीन सहकारी कारखान्यांनी गणेश करार करून ‘कोसंग’नावाचा आसवणी (डिस्टिलरी) प्रकल्प उभारला होता.त्यातून गणेश वगळता उर्वरीत कारखान्यांनी आपली मोठी आर्थिक प्रगती करून ‘गणेश’ पासून फारकत घेतली होती.या कोपरगाव आणि संजीवनी यांचे ‘बॉबी’,’भिंगरी’चे ‘आसवनी प्रकल्प’ हे राज्यात अग्रणी समजले जातात व त्यातून जवळपास १५००-१६०० कोटींचा महसूल राज्याच्या तिजोरीत भरला जातो तर ‘गणेश’चा प्रकल्प कोणाच्या खिजगणतीत नाही ? याला कोण जबाबदार आहे हे आज ‘गणेश’च्या स्वप्नांचे इमले दाखविणाऱ्यानीं जाहीर करायला हवे आहे.या उलट ‘गणेश’चे इथेनाल पळवून नेऊन व मळीत साखर सोडून ‘ती’ मळी आपल्या साखर कारखान्यात नेऊन त्या पासून ‘दारू’ पाडणाऱ्यांची त्यावर नफा कमविणाऱ्यांची येथे कमी नाही हा नेहमीचा अनुभव आहे.सन-२००६-२०११चा कालखंड सभासदानी आठवून पाहावा म्हणजे आपोआप पूरावा मिळेल.

सामाजिक परिवर्तन हे नेहमीच संथ गतीने होत असते व बहुतेक करून त्या स्थित्यंतराची जाणीव फार उशीराने समजते गणेश कारखान्यात त्याचा दाहक अनुभव शेतकरी संघटनेला आला आहे.शेतकरी संघटनेने पेरले पण ते उगविण्यास उशीर लागणार आहे.मात्र पेरलेले वाया जाणार नाही यावर त्यांनी विश्वास ठेवायला हवा व तसे प्रयत्न सुरु ठेवायला हवे आहे.

संजीवनी आणि कोपरगाव हे दोन्ही कारखान्यांची गाळप क्षमता आज प्रति टन ०५-०७ हजार टन प्रतिदिन झाली आहे तर गणेशची गाळप क्षमता उपलब्ध कागदपत्राणव्ये प्रतिदिन केवळ १,७५० टनावरच आहे.मग गणेश कारखाना का मागे पडला ? याचे उत्तर आज स्वप्न दाखविणाऱ्या नेत्यांनी सभासदांना द्यायला हवे आहे.मात्र या पातळीवर हि मंडळी मूग गिळणे पसंत करतील हे ओघाने आलेच.आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते कानाडोळा करतील.आता त्यांनी आपल्या निवडणुकीच्या सभांत जाहीर केल्या प्रमाणे ती गाळप क्षमता खरेच ०३ हजार टन प्रतिदिन करून दाखवली म्हणजे सभासद विश्वास ठेवतील मात्र या पातळीवर ते आगामी काळात मागील अनुभवाप्रमाणे ‘मौनीबाबा’ बनतील या बाबत आमच्या तरी मनात शंका नाही.त्यांनी आगामी सत्तेत आलेल्या नेत्यांनी काळात गणेशच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध असणारा ऊस पळवून नेला नाही तरी पुरे ! एवढे जरी केले तरी या कारखान्यावर व सभासदांवर यांचे मोठे उपकार होतील.यांनी जरी नाही नेला तरी याबाबत प्रवरा कारखान्याची हमी कोण देणार ? याचे चित्र ऊघड होणे गरजेचे आहे.कारण जो सत्तेत असतो तो गप्प बसतो मात्र दुसरा व विरोधक मात्र ‘गणेशच्या’ कार्यक्षेत्रातील ऊस नेल्याशिवाय राहात नाही हे वास्तव कोण नाकारणार आहे ? ईशान्य गडावरील युवा नेत्यांचा सत्कार प्रवरा गडावरील जि.प.त वरिष्ठ पद भूषविणाऱ्या एका महिला नेत्याने नुकताच केला असल्याच्या विश्वसनीय बातम्या आहे.त्या पातळीवर त्यांनी एवढी जरी हमी घेतली असती तर सभासदांना बरे वाटले असते.त्यामुळे किमान या कारखान्याचा मार्च-२०२३ या आर्थिक पातळीवरील ७२ कोटींचा तोटा कमी होण्यास मदत होईल.अन्यथा मागील सत्ताधाऱ्यांनी १९८५ साली भंगार,बैलगाड्या व विद्युत मोटारी विकल्याचे आरोप विरोधक आणि सभासदांकडून करण्यात आले होते.त्याची पुनरावृत्ती न झाली तरी कमावली.अनेकांना ‘गणेश’ चा अगस्ती व्हायला नको’ हा निकालाच्या दिवशीचा लेख सत्ताधारी समर्थकांना आवडला नाही.मात्र आगामी काळात याचा दाहक अनुभव आला नाही म्हणजे झाले !इति.’गणेश विजयाचे महापुराण’.

कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया जरून कळवा…..मो.९४२३४३९९४६.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close