जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

कोपरगावात…या विदयालयांत गुरु पौर्णिमा साजरी

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव शहरतील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात व्यास पौर्णिमेच्या निमित्तानं गुरु-शिष्य परंपरेची महती स्पष्ट करणारी गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे.

महात्मा गांधी यांनी त्यांचे आध्यात्मिक गुरू श्रीमद राजचंद्र यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या उत्सवाचे पुनरुज्जीवन केले. याला ‘व्यास पौर्णिमा’असेही म्हणतात.कारण हा दिवस म्हणजे महाभारताचे लेखक आणि वेद संकलित करणारे ऋषी वेद व्यास यांचा जन्मदिवस आहे. म्हणून या दिवशी व्यास यांची पूजा करण्याची प्रथा आहे.

गुरु पौर्णिमेचे महत्व स्पष्ट करतांना मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी भारतीय संस्कृती मध्ये गुरु-शिष्यची थोर परंपरा असुन विदयार्थीनी त्यांची माहीती करुन घेणे आवश्यक आहे असे स्पष्ट केले.या प्रसंगी मुल्यशिक्षण अंर्तगत परिपाठ सादर झाला.
नीदाफातेमा मन्सुरी,मुब्बाशिरा मन्सुरी,दिपाली आदमाने,सायली घोडराव,प्रिया मगर यांनी समुहगीतातुन प्रार्थना सादर केली.सुविचार इक्रा पठाण यांनी दिनविशेष प्रणिता आहिरे तर ठळक बातम्या वैष्णवी वाडेकर यांनी प्रस्तुत केल्या.गुरुपौर्णिमा निमित्तानं समूह नृत्य सृष्टी जाधव व रुपाली खामकर यांनी तर बोधकथा साची मुदबखे,प्रश्नमंजुषा तनुष्का सोनपसारे,तसेच गुरु पौर्णिमे विषयी इंग्रजीत माहिती-माहीन शाह,मराठीत तुन-क्रांती लासनकर यांनी सादर केली.

या प्रसंगी महर्षि व्यास यांच्या प्रतिमेचे पुजन मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वेदांत येवले व साई डांगे यांनी केले.उपस्थितांचे आभार गौरी राऊत यांनी मानले आहे.या नंतर सहभागी विद्यार्थिनीनी शाळेतील शिक्षकांचे औक्षण करून,भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव केला.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विदयालयांचे शिक्षक कुलदीप गोसावी,योगेश गवळे,पंकज जगताप,संजय बर्डे,संजीवनी डरांगे,सुजाता अजमेरे,पल्लवी तुपसैंदर,राजश्री बोरावके,सौ.एस.आर.गंगवाल,सौ.एस,डी.जाधव,सौ.एस.आर.अजमेरे आदि शिक्षकांनी विशेष परीश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close