संपादकीय
गणेशचा अगस्ती होण्याची साधार भीती…?
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
राहाता तालुक्याची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या आज संपन्न झालेल्या मतमोजणीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आ.स्नेहलता कोल्हे गटास स्पष्ट बहुमत मिळाले असून त्यात त्यांचे अठरा उमेदवार विजयी झाले असून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे गटास केवळ एक जागा मिळून त्यांचा धुव्वा उडाला आहे.या अपयशामुळे राज्य भाजपला विखें-कोल्हेच्या संघर्षाची मोठी किंमत मोजावी लागली असून त्याबाबत राज्यात चुकीचा संदेश गेला आहे.त्यामुळे आगामी काळात भाजपची रणनीती बदलू शकते.दरम्यान मंत्री विखे गटाने निळवंडे कालव्यांचे कालवा कृती समितीचे न्यायिक लढाईचे स्रेय लाटल्याने त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागली असल्याचे समजले जात आहे.
गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत थोरात-कोल्हे गटाचे विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे-
गाढवे अनिल सोपान,चौधरी संपत नाथाजी,टिळेकर अनिल राजाराम,सातव मधुकर यशवंतराव,कापसे अलेश शांतवन,गोंदकर शोभाबाई एकनाथ,धनवटे कमलबाई पुंडलिक,डांगे बाबासाहेब दादा,दंडवते विजय भानुदास,कार्ले नारायण ज्ञानेश्वर,डांगे गंगाधर पांडुरंग,हिंगे संपत कचरू,गोर्डे महेंद्र चांगदेव,चोळके बाळासाहेब कुंडलिक,नळे नानासाहेब काशिनाथ,फोफसे अरुंधती अरविंद,लहारे सुधीर वसंतराव,शेळके विष्णुपंत शंकर आदींचा समावेश आहे.तर विखे गटाचे हे ज्ञानदेव बाजीराव चोळके हे एकमेव उमेदवार विजयी झाले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”राहाता तालुक्याची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुक दि.१७ जून रोजी संपन्न झाली होती या निवडणुकीत एकूण ८९.०५ टक्के मतदान आले हॊते.त्यामुळे या निवडणुकीत काही आक्रीत घडणार व सत्तांतर घडणार व यात थोरात-कोल्हे गट बाजी मारणार हे ‘जनशक्ती न्यूजसेवा’ने दि.१६ जून रोजीच्या,”नुकसान मात्र गणेशाचेच” या संपादकीयात अधोरेखित केले होते.त्याबाबत आज दुपारी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.या निवडणुकीत हा सामना तिरंगी झाला होता.यात राज्याचे महसुलमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांचा जनसेवा,भाजपचे कट्टर विरोधक समजले जाणारे माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात व कोल्हे गटाचा गणेश परिवर्तन मंडळाचे विरुद्ध शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी दंड थोपटले होते.शेतकरी संघटनेचे ०७ उमेदवारांचा पॅनल रिंगणात होता.तर कोल्हे गटाच्या एका उमेदवारांची वेळेत माघार न झाल्याने तो उमेदवारही अपक्ष म्हणुन रिंगणात होता.१९ जागांसाठी ४७ उमेद्वार रिंगणात होते.
गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत थोरात-कोल्हे गटाचे विजयी झालेले उमेदवार वरील प्रमाणे छायाचित्रासह-
त्यामुळे आधीपासून या निवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे सुपुत्र खा.सुजय विखे आदींनी निवडणूक लागल्यावर एकतर्फी पाच वर्षांचा करार वाढवून भाजप सरकारच्या व आपल्या अकलेचे दिवाळे काढले होते.त्या निर्णयातच आगामी निकाल दडला होता.यांच्या थेट सभासदांना गद्दारी करणाऱ्यांना,” दि.१९ जूनच्या निकालानंतर पाहून घेऊ”आदी दमदाटीची भाषणे कोणाही सुज्ञास विचार करण्यास लावणारी ठरली होती.म्हणजे हि लोकशाही आहे की ठोकशाही ? असा प्रश्न कोणास हि पडावा अशी हि स्थिती चिंता निर्माण करणारी ठरली होती.त्यामुळे विखेंचा आगामी प्रतिकूल भविष्य काळ उघड झाला होता.निकाल काय ती औपचारिकता तेवढी उरली होती.
आगामी काळात आम्ही सांगितल्या प्रमाणे आगामी पाच वर्ष हे संघर्षात जाणार आहे.कारखाना चालू होण्याची शक्यता फारच कमी राहणार आहे.कारण कारखाना सुरु करण्याच्या मंजुऱ्या,परवाने,राज्य वा जिल्हा बँकेकडून आर्थिक तरतूद,कर्ज आदी सोपस्कार करणे सोपे नाही.त्यामुळे गणेशाचा अगस्ती होण्याची शक्यता अधिक आहे.कारण अगस्तीत काही वर्षापूर्वी २००३ साली असेच सत्तांतर झाले होते.त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते.आणि मधुकर पिचड हे त्या सरकार मध्ये मंत्री होते.त्यांनी वर उल्लेख केल्या प्रमाणे सदर कारखाना संचालक मंडळास अवघ्या एक हंगामात एक-दीड वर्षात गुडघे टेकण्यास भाग पाडले होते हे विसरता येणार नाही.मात्र कोल्हे गटाची अध्यक्षपदी निवड झाली तर एकवेळ काही दिलासा मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
खरे तर या संघर्षाची सुरुवात संगमनेर तालुक्यापासून सुरु झाली होती.जोर्वे आणि आश्वी गट हे दोन गट कळीचा मुद्दा ठरला आहे.त्या ठिकाणी नुकत्याच झालेल्या हाणामाऱ्या,त्याचे शहर आणि तालुक्यात उमटलेले पडसाद त्यात,’भगवा मोर्चा’ त्यास विखेंनी पुरवलेले पाठबळ जसे कारणीभूत ठरले होते.तसेच त्या अगोदर संपन्न झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका याही कारणीभूत ठरल्या आहेत.या पूर्वीचा,’ एकमेकांच्या कार्यक्षेत्रात न जाण्याचा व एकमेकांना आव्हान न देण्याचा पाळला गेलेला करार’ या निवडणुकीत पहिल्यांदा मोडला गेला असा कोणाची हि सहज समज होईल.मात्र वास्तव तसे नव्हते त्या आधी तळेगाव दिघे,निमोण आदी सह संगमनेर तालुक्यातील जवळपास २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत महसूल मंत्री विखे यांनी ‘तो’ मोडला होता.निळवंडे कालवा कृती समितीने आपल्या कालव्यांच्या कामासाठी निर्माण केलेली आंदोलने आणि न्यायिक लढाई यातून जो असंतोष उफाळला होता.तो निवडणुकीच्या माध्यमातून विखे यांनी आपल्या पदरात पाडून घेतला होता.कारण कालवा समितीने,”जो पर्यंत शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येत नाही तो पर्यंत कालवा कृती समिती कोणत्याही निवडणुकीत भाग घेणार नाही” व कोणाच्या व्यासपीठावर जाणार नाही कोणाचा झेंडा आणि काठी हाती घेणार नाही” हे आधीच जाहीर केले आहे.त्यामुळे निर्माण झालेली नाराजी महसूल मंत्री विखे यांना ‘कॅश’ करण्याचा मोह आवरला नाही.परिणामस्वरूप त्यांनी थोरातांच्या अंगणात जाऊन तमाशा सुरु केला त्यातून थोरात यांच्या जवळपास पंचवीस ग्रामपंचायती हातोहात निघून गेल्या यांचा थोरात यांना विशेष राग होता.त्यातून सन-२०१९च्या विधानसभा निवडणुकीत माजी महसूल मंत्री यांचे बोटावर निभावले होते.त्यातून त्यांनी आपला निश्चय पक्का केला होता.नाही म्हणायला शिक्षक पदवीधर मतदार संघात थोरात यांची मुलगी आमदार करण्याचे स्वप्न महसूल मंत्री विखे यांच्यामुळे भंगले होते.कारण त्यांनीच थोरात यांच्या भाच्याला रसद पुरवली होती.हि सल थोरात ना बोलून दाखवत होते.मात्र तो पराकोटीचा राग काढण्याची नामी संधी त्यांना गणेशच्या माध्यमातून त्यांना शेतकरी संघटनेने मिळवून दिली होती.एरवी हि निवडणूक बिनविरोध होणार होती.मात्र शेतकरी संघटनेने व निळवंडे कालवा कृती समितीचे वकील अड्.अजित काळे यांनी सगळे मुसळ केरात घातले होते.नाही तर कोल्हे गट निवडणूक रिंगणात येण्याच्या स्थितीत नव्हता हे उघड होते.त्यांना पुणतांबा,चितळी गट विधानसभा निवडणुकीसाठी महत्वाचा आहे.या शिवाय कोपरगावात परजणे गटही तितकाच निर्णायक आहे हे सांगण्यास कोणा ज्योतिषाची गरज नाही.त्यामुळे विखेंचा शेपटावर पाय देण्याचे धारिष्ट्य ते करणे शक्य नव्हते.मात्र शेतकरी संघटनेने प्रवेश केला आणि सर्व चित्र बदलून गेले होते.त्यामुळे कोल्हे गटास बिनविरोध निवडणूक करण्याचे मनसुबे असताना ते उधळून गेले व नाईलाजाने त्यांना निवडणुकीच्या फडात उतरावे लागले आहे.आता त्याचा सामना आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पाहायला मिळणार आहेच पण खरी कसरत पाहायला मिळणार आहे ती आगामी काळात संपन्न होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत.पण आता माजी मंत्री थोरात गट बरोबर आल्याने त्यांचे धारिष्ट वाढले खरे पण आता भाजप मध्ये कोल्हे गटाची कोंडी करण्याची एकही संधी विखे गट सोडणार नाही हे उघड आहे.त्यामुळे गणेश कारखाना चालणे तर दूरच पण रांगणे अवघड होणार आहे.कारण जनशक्ती न्यूजसेवा”ने आधीच स्पष्ट केल्याने विखेंच्या सोबतीला भाजप सरकार असल्याने वाढीव पाच वर्ष कराराची खुंटी काढणे फारच जिकरीचे बनणार आहे.मात्र आता सोबतीला प्रसिद्ध विधीज्ञ अड्.अजित काळे असणार नाही हे उघड गुपित ठरणार आहे.त्यांच्या शेतकरी संघटनेला तिरंगी लढतीत आजी-माजी कामगारांनी व त्यांच्या नेत्यांनी अड्.काळे यांचा कठीण काळात वापर करून ठेंगा दाखवला असंल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे त्यांची स्थिती नाजूक बनली होती.त्यामुळे आगामी काळात आम्ही सांगितल्या प्रमाणे आगामी पाच वर्ष हे संघर्षात जाणार आहे.कारखाना चालू होण्याची शक्यता फारच कमी राहणार आहे.कारण कारखाना सुरु करण्याच्या मंजुऱ्या,परवाने,राज्य वा जिल्हा बँकेकडून आर्थिक तरतूद,कर्ज आदी सोपस्कार करणे सोपे नाही.त्यामुळे गणेशाचा अगस्ती होण्याची शक्यता अधिक आहे.कारण अगस्तीत सन-२००३ साली असेच सत्तांतर झाले होते.त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते.आणि पिचड हे त्या सरकार मध्ये मंत्री होते.त्यांनी वर उल्लेख केल्या प्रमाणे सदर कारखाना संचालक मंडळास अवघ्या दिड वर्षात गुडघे टेकण्यास भाग पाडले होते हे विसरता येणार नाही.निवडून आलेले संचालक हे बाहुले असणार आहे हे उघड आहे.त्यासाठी त्याना प्रत्येक गोष्टीसाठी थोरात आणि कोल्हे गटावर अवलंबुन राहावे लागणार आहे.त्यामुळे कोल्हे आणि थोरात यांच्या मागे ईडीची पीडा लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे अशा वेळी,’पिराचे पिरास पडले तर नवल नाही,फकिराचे पाहायला वेळ माजी महसूल मंत्री थोरात आणि माजी आ.कोल्हे गटास वेळ मिळाला म्हणजे मिळवली’ अशा वेळी गणेशची काय स्थिती होईल याची कल्पना न केलेली बरी.अशा प्रसंगी,’गणेशचे कल्याणच होवो ! हि सदिच्छा व्यक्त करण्याखेरीज आपल्या हाती तरी काय आहे ?