सहकार
राहाता तालुक्यातील या संस्थेने सभासदांना दिला १० टक्के लाभांश
न्यूजसेवा
लोहगाव (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील सहकारात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या लोहगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभासदांना दिवाळीनिमित्त सभासदांच्या बँक खात्यावर १० टक्के लाभांश जमा केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र केरूनाथ चेचरे व उपाध्यक्ष अशोक सुकदेव चेचरे यांनी दिली आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
“सदर संस्थेत एकूण सभासद १८४ असून दिवाळी निमित्त एक लाख ७४ हजार रुपये संस्थेच्या सभासदांना दिले आहे.लाभांश वाटप करण्यापूर्वी संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली त्यात १० टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”-राजेंद्र चेचरे,अध्यक्ष,लोहगाव विविध कार्यकारी सहकारी संस्था.
संस्थेच्या या यशाचे केरूनाथ चेचरे,भास्करराव चेचरे,कामगार पोलीस पाटील वसंतराव चेचरे, बबनराव चेचरे,माजी सरपंच गणेश चेचरे,धुळाजी चेचरे,गणपत चेचरे,संंजय चेचरे,बळीराम चेचरे, रघुनाथ दरंदले,विजय दरंदले दत्तात्रेय चेचरे,बाबासाहेब वांगे,विनायक दरंदले,कृष्णा चेचरे,अनिल चेचरे,दिलिप इनामकेे,किशोर तुरकणे,किशोर दरंदले आदींनी अभिनंदन केले आहे.
सदर संस्थेच्या यशात लक्ष्मण चेचरे,प्रवीण चेचरे,गोरक्ष गोपाळे,वसंतराव नेहे,हरिभाऊ चेचरे,किरण इनामकेे,लक्ष्मण तांबे,चंद्रकला दरंदले,मंदाताई चेचरे,सचिव आर.व्ही.चेचरे मोलाचे सहकार्य लाभत असल्याची माहिती दिली आहे