सहकार
कोपरगांवातील हि बँक सभासदांना १५ टक्के लाभांश देणार-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अ.नगर जिल्हयातील अग्रगण्य असंलेली दि कोपरगांव पिपल्स को-ऑप बॅक लि.ची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने नुकतीच बॅकेचे अध्यक्ष सत्येन सुभाष मुंदडा यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. बॅकेचे असि.जनरल मॅनेजर जे.पी.छाजेड यांनी सभेतील विषय पत्रिकेनुसार वाचन केले व प्रत्येक विषयानुसार सविस्तर चर्चा होउन सर्व ठरावांना मंजूरी मिळाली व सर्व ठराव बहुमताने मंजूर झाले असून सभासदांना या वर्षी १५ टक्के लाभांश देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.त्याचे सभासदांनी स्वागत केले आहे.
“कोपरगाव पीपल्स बॅकेचे जळीत घटनेस २७ वर्ष पुर्ण झालेली असुन एवढी मोठी जळीत घटना घडल्यानंतरही तात्काळ उभारी घेउन ग्राहकांना सेवा देणारी आपली बॅक निश्चीतचे भारतात प्रथम असेल व मागील दिड वर्षापासुन कोविड महामारीमुळे व्यवसायावर परिणाम झालेला असतांनाही बॅकेने उज्वल प्रगती करून १५ टक्के लाभांश जाहीर केला आहे”-रवींद्र बोरावके,सभासद व भाजप.प्रदेश कार्यकारिणी सदस्य.
बँकेचे अध्यक्ष सत्येन मुंदडा यांनी आपल्या भाषणात बॅकेचे आर्थिक स्थीतीची माहिती देतांना कोविड महामारीच्या काळात बॅकेच्या संचालक मंडळाच्या धोरणात्मक निर्णयानुसार बॅकेच्या आर्थिक स्थैर्यात विशेषता रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक मापदंडाप्रमाणे आर्थिक निकषांत भर घालुन बॅकेची आर्थिक स्थिती अधिक सुदृढ व निकोप वाढविलेली आहे याची माहिती देत आगामी काळातील बॅकेची वाटचाल व काही नवनविन सेवा देणार आहेत यांची सविस्तर माहिती दिली आहे.
बॅकेने मोबाईल बॅंकींग व नेट बॅंकींग सुरु करण्याकरिता रिझर्व्ह बॅकेकडे प्रस्ताव पाठविलेला असुन त्यांचे मंजूरीनंतर सदरची सुविधा चालु करीत आहोत.तसेच अत्याधुनिक सेवा देण्याकरीता पुर्णता सुरक्षित उत्तम साॅफटवेअर प्रणाली घेतली असुन त्याचा निश्चितच ग्राहकांना बॅंकींग सेवा देण्यासाठी उपयोग होणार आहे.बॅंकेने विविध प्रकारची एसएमएस सुविधा तसेच सर्व खातेदारांना मोबाईलवर आपल्या खात्याची माहिती देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे याचा लाभ घेण्यासाठी सर्व खातेदारांनी बॅंकेकडे आपला मोबाईल नंबर नोंदवावा असे आवाहन चेअरमन सत्येन मुंदडा यांनी केले आहे.बॅकेवर असलेला सभासदांचा व ग्राहकांचा विश्वास व त्यांचे सहकार्यामुळे बॅक प्रगतीकडे वाटचाल करीत असुन नुकतेच झालेल्या लेखापरीक्षणात बॅकेस ‘अ’ वर्ग मिळाल्याबदद्ल समाधान व्यक्त केले व सभासदांना १५ टक्के लाभांश जाहिर करण्यात आला.
यानंतर सभासद केशवराव भंवर यांनी सध्याचे कोविड वातावरणामध्ये ज्या सभासदांचे या महामारीत निधन झाले त्यांचे कुटुंबीयांना बॅकेचे वतीने त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी असे सुचविले. बॅकेचे सभासद सुधिर बज यांनीही चर्चेत भाग घेतला.सभासदांचे प्रश्नावर जनरल मॅनेजर दिपक एकबोटे यांनी सभासदांना उत्तरे दिली.सभेनंतर बॅकेचे सभासद डाॅ.एकनाथ गोंदकर,अविनाश दंडवते,महेंद्र शेळके यांची श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बॅकेचे संचालक कैलासचंद ठोळे,डाॅ. विजय कोठारी,सुनिल कंगले,रविंद्र लोहाडे, धरमचंद बागरेचा,कल्पेश शहा,अतुल काले,राजेंद्र शिंगी,सुनिल बंब,वसंतराव आव्हाड,यशवंत आबनावे,हेमंत बोरावके,रविंद्र ठोळे,सेवक संचालक विरेश पैठणकर,विठ्ठल रोठे उपस्थित होते. शेवटी चेअरमन मुंदडा यांनी सर्व सभासदांचे तसेच ऑनलाईन मिटींग करीता सेवा देणारे नितीन बागरेचा यांची सर्व टीम तसेच आय.टी.विभागातील मुख्य सिनिअर ऑफीसर चंद्रशेखर व्यास, त्यांचे सहकारी गणेश काळे यांचे आभार व्यक्त केले.