सहकार
खंडाळा येथील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर
न्यूजसेवा
वाकडी ( प्रतिनिधी )
श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील खंडाळा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या चेअरमनपदी संजय आप्पासाहेब बोरकर तर व्हाईस चेअरमनपदी बापूसाहेब भागवत विघावे यांची निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जितेन्द्र पवार ;सहकारी अधिकारी सहाय्यक निबंधक यांनी काम पाहिले.
खंडाळा सोसायटीच्या चेअरमन पदासाठी सुचना गावचे तंटामुक्ती अध्यक्ष खंडेराव जगन्नाथ सदाफळ यांनी मांडली तर अनुमोदन डाॅ.बापूसाहेब कारभारी ढोकचौळे यांनी दिले तसेच व्हाईस चेअरमन पदाकरिता सुचना सौ.मिराबाई गोरक्षनाथ बोरकर यांनी मांडली तर अनुमोदन सुरेखा भाऊसाहेब सदाफळ यांनी दिले.
यावेळी सोसायटी संचालक अमोल सिताराम शिंगोटे,सुनिल मच्छिंद्र ढोकचौळे,मुरलीधर नामदेव बोळगीर,रावसाहेब बापूसाहेब ढोकचौळे, मदन भाऊसाहेब चौधरी , नवनाथ गंगाधर ढोकचौळे ,विजय आण्णासाहेब सदाफळ,महेश भाऊसाहेब ढोकचौळे, राजेन्द्र सयराम मुंढे,प्रभाकर धनराज साबदे आदि संचालक सदस्य उपस्थित असून अरविंद नानासाहेब डेंगळे,सुरेश नामदेव ढोकचौळे,भास्करराव कारभारी ढोकचौळे(माजी तंटामुक्ती अध्यक्ष),दिनकर जगन्नाथ सदाफळ(माजी उपसरपंच )अशोकराव शिवाजी पवार(प्रथम लोकनियुक्त सरपंच),अनिल रामकृष्ण ढोकचौळे,महेश दत्तात्रय मरकडे(उपसरपंच खंडाळा )बाबासाहेब कारभारी ढोकचौळे,बाळासाहेब विठ्ठल ढोकचौळे,नारायण आप्पासाहेब शिंगोटे,किरण बाळासाहेब ढोकचौळे,दिपक पदमाकर ढोकचौळे, गोरखनाथ खंडूजी बोरकर ,गोरक्षनाथ रामभाऊ सदाफळ अनिकेत भाऊसाहेब सदाफळ , बाळासाहेब कारभारी बोरकर ,राजेंद्र निवृत्ती सदाफळ , गोपीनाथ रंगनाथ सदाफळ , अमोल जयसिंग ढोकचौळे,राहुल अशोक शिंगोटे,भास्कर छबूजी ढोकचौळे,संदिप विघावे,ताराचंद अलगुंडे ,भिकाजी खरात,निलेश ढोकचौळे इत्यादि सोसायटी सभासद व ग्रामस्थ हजर होते.