सहकार
धामोरी विकास संस्थेच्या उपाध्यक्षपदाची निवड संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात सहकारात अग्रणी समजल्या जाणाऱ्या धामोरी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदी प्रा.नारायण बारे यांची निवड झाली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
त्यांच्या निवडीची सूचना जेष्ठ मार्गदर्शक संचालक चंद्रशेखर कुलकर्णी यांनी मांडली होती.त्याला संचालक भाऊसाहेब खिलारी यांनी अनुमोदन दिले होते.त्यावेळी नूतन उपाध्यक्ष प्रा.बारे यांचा उपस्थितांचे हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
या विकास संस्थेची बँक पातळीवर १०० टक्के वसुली झालेली आहे.दर वर्षी सभासदांनी लाभांश वाटप केला जातो.सदर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भगवान माळी,गौतम बँकेचे संचालक पुंडलिक माळी,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,अनिल दरेकर,भास्करराव वाघ,अरुण भाकरे,माणिक सोमासे,भाऊसाहेब माळी,देवराम माळी,सतीश कोळपे,बाळासाहेब अहिरे,दिलीप माळी,प्रा.संदीप जगझाप, दिलीप खिलारी,सचिव मनोज कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.नूतन उपाध्यक्ष प्रा.बारे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.