जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

…या सहकारी बँकेचा नफा जाहीर !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   उत्तर नगर जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या गौतम सहकारी बँकेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेला ४१४.०६ लाख रुपये ढोबळ नफा झाला असून सर्व तरतुदी करून निव्वळ नफा १३५.४८ लाख झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष संजय आगवन यांनी दिली आहे.

“माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे आदींच्या नेतृत्वाखाली बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा आणि निष्ठेमुळेच एवढे मोठे यश मिळवता आले आहे.संचालक मंडळाने वेळोवेळी दाखवलेला विश्वास आणि दिलेले पाठबळ यामुळे बँक प्रशासनाला धोरणात्मक निर्णय घेऊन हे यश मिळवता आले आहे”-बापूसाहेब घेमुड,प्रशासकीय अधिकारी,गौतम सहकारी बँक.

   कालच वित्तीय वर्षे संपले असून विविध सहकारी बँका आणि पतसंस्थांचा लेखा जोखा जाहीर होत आहे.त्यात आज कोपरगाव तालुक्यातील गौतम सहकारी बँकेने आपला ताळेबंद जाहीर केला आहे.त्यात त्यांनी बँकेचा निव्वळ १५% ने वाढून १ कोटी ३५ लाख ४८ हजारांपर्यंत पोहोचला असल्याचा दावा केला आहे.तर स्थूल नफ्यात मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ७४% ची मोठी वाढ झाली आहे.ही आकडेवारी बँकेच्या भक्कम आर्थिक स्थितीची साक्ष देत आहे.बँकेने केवळ नफ्यातच नाही तर एकूण व्यवसायातही वाढ केली असल्याचा त्यांचा दावा आहे.

  वर्तमानात बँकेकडे एकूण १४८ कोटी ५० लाख रुपयांच्या ठेवी असून चालू वर्षी बँकेने ८९ कोटी ५५ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.बॅकेची गूतवणुंक ७७०४.२७ लाख असून सी.आर.अ.आर १९.३८% आहे.पी.सी.आर २१६.७३% आहे. नेटवर्थ १३९८.६१ लाख आहे.या बँकेचे एकूण व्यवहार २३८०६.४८ लाखांच्या जवळपास पोहोचले आहे.विशेष म्हणजे प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर बँकेने आपला नेट एन.पी.ए.सलग दुसऱ्या-तिसऱ्या वर्षी ०% राखण्यात यश मिळवले आहे.ग्रॉस एन.पी.ए.सुद्धा ५%चे आंत ४.४२% पर्यंत राखला आहे.वार्षिक सभेत मान्यता घेऊन सभासदांना लाभांश वाटप करण्यात येणार आहे.बँकेने केलेल्या या कामगिरीबद्दल माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे यांनी बँकेचे अध्यक्ष संजय आगवण,उपाध्यक्ष,संचालक मंडळ,प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुद व अधिकारी,कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close