जाहिरात-9423439946
सहकार

…या कारखान्याला कार्यक्षमता पुरस्कार!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   साखर उद्योगातील शिखर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी (पुणे) यांचे तर्फे गाळप हंगाम २०२४-२५ या वर्षाकरीता मध्य विभागातुन तांत्रिक कार्यक्षमता प्रथम पुरस्कार हा साखर उत्पादन प्रक्रियेत तांत्रिक नियोजन,आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व उच्च कार्यक्षमतेचे निकष यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे यांनी दिली आहे.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना.

  

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याने उत्पादन खर्चात बचत करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न केला आहे.कारखान्याने विस्तारीकरण व करून पूर्ण क्षमतेने गाळप होत आहे.ऊस गाळप करतांना कमीत कमी साखरेचा अपव्यय,बगॅस बचत,स्टीमचा कमीत कमी वापर,साखरेचा दर्जा याचा अवलंब करून कारखान्याचा कारभार सुरु आहे.त्याच्या सह कारखान्याचे सभासद,ऊस उत्पादक शेतकरी,संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान आहे”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष,कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाना.

   साखर उद्योगातील शिखर संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट,पुणे यांच्या वतीने साखर क्षेत्रात उत्तम कामगिरीबद्दल दरवर्षी पुरस्कार जाहीर केले जातात त्याप्रमाणे २०२४-२५ च्या गळीत हंगामात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील अनेक साखर कारखान्यांना विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.यामध्ये प्रथम क्रमांकाच्या तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कारासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची निवड करण्यात आली आहे.कारखान्यास मागील वर्षी २०२३-२४ च्या गळीत हंगामात मध्य विभागातून दुसऱ्या क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार मिळाला होता.त्यामध्ये सुधारणा करून अधिक तांत्रिक कार्यक्षमतेचा वापर करून मध्य विभागात तांत्रिक कार्यक्षमता प्रथम पुरस्कार मिळविला आहे.

   कारखान्याने मिल मधील ऊसाचा तंतुमय निर्देशांक-८६.६%,रिड्यूस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन (RME)-९६.१६,प्रायमरी एक्सट्रॅक्शन-७३.९,बगॅसची बचत % ऊस-८.७७%, गाळप क्षमतेच्या वापरा मध्ये वाढ ८.१२%,बगॅस मधील साखरेच्या व्येयाचे प्रमाण-०.५२,गाळप बंद काळाचे प्रमाण (मेकॅनिकल अॅन्ड इलेक्ट्रिकल)-०.०%,पाण्याचा वापर % फायबर २६१.९९,साखर उतारा ११.२०% मिळाला होता.या कामगिरीची दखल घेवून २०२४-२५ च्या गळीत हंगामासाठी मध्य विभागातून  प्रथम क्रमांकाच्या तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कारासाठी या सहकारी साखर कारखान्याची निवड करण्यात आली आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दि.२९ डिसेंबर रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,एकनाथ शिंदे,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close