सहकार
…या सहकारी पतसंस्थेच्या पुरस्कार प्रदान !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रणी असलेल्या पद्मविभूषण डॉ.शरदचंद्र पवार नागरी सहकारी पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा नाशिक विभागातील प्रथम पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

पद्मविभूषण डॉ.शरदचंद्र पवार नागरी सहकारी पतसंस्थेने या वर्षी सप्टेंबर अखेर रु.५० कोटींचा टप्पा पार केला आहे.ग्राहकांसाठी लॉकर सुविधा,डिजिटल बँकिंग सुविधा व नियमितपणे १५ टक्के लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा नाशिक विभागाच्या वतीने ०५ कोटी ते ५० कोटीच्या ठेवी गटातील पतसंस्था मध्ये पद्मविभूषण डॉ.शरदचंद्र पवार पतसंस्थेला हा प्रथम पुरस्कार कर्नाटक राज्यातील कुमटा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात माजी सहकार आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर,राज्य फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
सदर पुरस्कार हा संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र रोहमारे,संचालक अनिल महाले,व्यवस्थापक मंगेश देशमुख यांनी हा पुरस्कार स्विकारला आहे.त्याबद्दल माजी आ.अशोक काळे तसेच आ.आशुतोष काळे,उपाध्यक्ष संचालक मंडळ व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या पूर्वीही पद्मविभूषण डॉ.शरदचंद्र पवार पतसंस्थेला सलग दोन वर्षे बँको ब्लू रिबिन पुरस्कार मिळालेला आहे.संस्थेचे भागभांडवल वाढीचे प्रमाण,ठेवी वाढीचे प्रमाण,उत्पन्न व खर्चाचे प्रमाण,अनुत्पादक कर्जाचे प्रमाण,सि.आर.आर.,एस.एल.आर.,सि.आर.ए.आर.या व इतर अनेक बाबतीत संस्था सहकार खात्याच्या नियमांचे सातत्याने पालन करीत आहे.संस्थेने या वर्षी सप्टेंबर अखेर रु.५० कोटींचा टप्पा पार केला आहे.ग्राहकांसाठी लॉकर सुविधा,डिजिटल बँकिंग सुविधा व नियमितपणे १५ टक्के लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.